Home /News /lifestyle /

आहारात या गोष्टी खाणं आजच थांबवा; प्रतिकारशक्ती दुबळी बनवण्यावर करतात थेट परिणाम

आहारात या गोष्टी खाणं आजच थांबवा; प्रतिकारशक्ती दुबळी बनवण्यावर करतात थेट परिणाम

Immunity Weakening Foods : आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेक असे पदार्थ नकळत घेत राहतो. परंतु, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण त्यांचं सेवन टाळलं पाहिजे. जाणून घेऊ रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ नये म्हणून आहारात कोणते पदार्थ टाळले पाहिजेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 जानेवारी : रोगप्रतिकार शक्ती आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत झाल्यामुळं आपल्याला विविध प्रकारचे रोग किंवा संसर्ग होऊ शकतात. परंतु आपल्या स्वतःच्या जीवनशैलीवर आणि आपल्या खाण्याच्या सवयींवर प्रतिकारशक्ती अवलंबून असते. काही फळं, भाज्या आणि इतर पदार्थ आहेत, ज्यात जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. म्हणूनच ते आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतात. तर, असे काही पदार्थ आहेत, जे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. चला, अशाच काही पदार्थ किंवा पदार्थांबद्दल (Immunity Weakening Foods) माहिती घेऊ. आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेकदा हे पदार्थ नकळत घेत राहतो. परंतु रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण त्यांचं सेवन टाळलं पाहिजे. जाणून घेऊ रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ नये म्हणून आहारात कोणते पदार्थ टाळले पाहिजेत. कॅन केलेला आणि पॅकेज केलेले पदार्थ हल्ली पॅकबंद खाद्यपदार्थांचा वापर बिनदिक्कतपणे होत आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की, असे पदार्थ खाल्ल्यानं आपली प्रतिकारशक्ती कमजोर होते. तेव्हा आपण त्यांचा वापर मर्यादित केला पाहिजे. डबाबंद आणि पॅकबंद वस्तू जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी प्रिझर्व्हेटिव्ह्ज आरोग्यासाठी हानिकारक असतात. जास्त मीठ वापरू नका मीठ हा आपल्या अन्नात वापरला जाणारा एक आवश्यक घटक आहे. परंतु एका मर्यादेपेक्षा जास्त मीठ वापरल्यानं आरोग्याशी संबंधित इतर समस्या निर्माण होतात. शिवाय, आपल्या प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होतो. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानं रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. कारण मीठामध्ये भरपूर सोडियम आढळतं. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी आपण जास्त प्रमाणात मीठ खाणं टाळलं पाहिजे. हे वाचा - थंडीच्या दिवसात हे 6 प्रकारचे ज्युस नक्की प्या; प्रतिकारशक्ती वाढेलच रहाल एकदम तंदुरुस्त प्रक्रिया केलेलं मांस खाणं टाळा प्रक्रिया केलेले मांस रोगप्रतिकारक शक्तीला तर हानी पोहोचवतंच; शिवाय, त्याचा तुमच्या पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. मांस दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करताना त्यात त्यात अनेक रसायनं वापरली जातात. ती आरोग्यासाठी हानिकारक असतात. प्रक्रिया केलेलं मांस खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. हे वाचा - Eggs Tips: चुकूनही अंडी फ्रीजमध्ये ठेवू नका; नाहक हे त्रास मागे लागतील वारंवार फास्ट फूड खाणं टाळा आजकाल फास्ट फूड हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. परंतु त्यात कॅलरीज आणि चरबी, साखर, मीठ मोठ्या प्रमाणात असतं. याच्यामुळं आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे हानी पोहोचते. तसंच आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. फास्ट फूडमध्ये फायबरचं प्रमाणही नगण्य असतं. त्याचा आपल्या चयापचयावर वाईट परिणाम होतो. त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण फास्ट फूडचं सेवन टाळलं किंवा कमी केलं पाहिजे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या