Home /News /lifestyle /

Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध नसेल तर लोकांना हिवाळ्यात अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळं लोकांना हात-पायांमध्ये थंडी जाणवू लागते. या स्थितीचा सामना करण्यासाठी शरीराला पोषक आहाराची गरज (best dry fruits for weakness) असते.

    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : काही लोकांना हिवाळ्यात अशक्तपणा (weakness) जाणवतो. याची अनेक कारणं आहेत. तापमानात घट झाल्यामुळे शरीराला अवयवांची हीट मेन्टेंन ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यासाठी अतिरिक्त ऊर्जा लागते. अशी अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध नसेल तर लोकांना हिवाळ्यात अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळं लोकांना हात-पायांमध्ये थंडी जाणवू लागते. या स्थितीचा सामना करण्यासाठी शरीराला पोषक आहाराची गरज (best dry fruits for weakness) असते. सुका मेवा (dry fruits) शरीराला पौष्टिक घटक मिळवून देण्यासाठी योग्य आहे. सुक्या मेव्यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असल्यानं ते शरीराला उबदार ठेवतात, ते त्वरित ऊर्जा देखील देतात आणि शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठादेखील करतात. कोरड्या फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा 3, सेलेनियम, प्रथिनं असतात, जी शरीराला त्वरित ऊर्जा देतात. सुक्या मेव्यामुळं शरीराला झटपट ऊर्जा मिळते. तसंच, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार, बद्धकोष्ठता आदी समस्यांमध्येही सुका मेवा उपयुक्त ठरतो. जाणून घेऊया, सुका मेवा (Dry fruits) खाण्याचे काय फायदे आहेत. या पाच ड्रायफ्रुट्सच्या सेवनानं मिळते त्वरित ऊर्जा बेदाणे किंवा मनुका HTK च्या बातमीनुसार, मनुका किंवा ड्राय फ्रूट्स जलद उर्जेसाठी सर्वोत्तम ड्राय फ्रूट आहेत. यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटचे लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन लगेच ऊर्जा मिळते. याशिवाय बेदाण्यामुळे अॅसिडिटीवरही झटपट आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. अक्रोड अक्रोड हे फळ अतिशय पौष्टिक आहे. त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, आहारातील फायबर, प्रथिनं, विविध जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हिवाळ्यात अक्रोड खाल्ल्यानं अनेक फायदे होतात. हे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील चांगलं मानलं जातं. यामुळे मेंदूला ताकद मिळते आणि शारीरिक कमजोरी लवकर दूर होते. हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत बदाम बदामांमध्ये कोलेस्टेरॉल शून्य असते. त्यात चरबी अजिबात नसते. हे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. बदाम खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल तयार होण्यास प्रतिबंध करतात. इतकंच नाही तर, बदामांमुळे बद्धकोष्ठता आणि श्वसनाच्या समस्यांपासूनही सुटका मिळते. हृदय, दात आणि त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहेत. काजू काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि बी6 मुबलक प्रमाणात आढळतात. काजूच्या सेवनानं शरीर खूप लवकर गरम होते, म्हणजेच रक्ताभिसरण गतिमान होते. बदामाप्रमाणेच याच्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. हे वाचा - Dreams Signs: अशी स्वप्नं तुम्हालाही पडतात का? भविष्यात भरपूर पैसा मिळण्याचे असे असतात संकेत खजूर हिवाळ्यात खजूर खाल्ल्यानं शरीर उबदार राहते. याच्यामुळं शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खजूरामध्ये आहारातील फायबरदेखील असतं, जे पचनसंस्थेला चालना देतं. याशिवाय, खजूर शरीरातील व्हिटॅमिन बी5 ची कमतरता दूर करतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या