Home /News /lifestyle /

Herbal Tea For Winter: थंडीत नॉर्मल चहाऐवजी हे 5 प्रकारचे हर्बल Tea ट्राय करा; आरोग्यासाठीही आहेत फायदेशीर

Herbal Tea For Winter: थंडीत नॉर्मल चहाऐवजी हे 5 प्रकारचे हर्बल Tea ट्राय करा; आरोग्यासाठीही आहेत फायदेशीर

Herbal Tea For Winter: आपला चहाच काढ्याचं कामही करू लागला तर चहा पिण्याचा आनंद द्विगुणित होईल ना? होय, काही नैसर्गिक घटकांच्या मदतीनं तुम्ही चहाला चवदार आणि फायदेशीर बनवू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 प्रकारच्या चहांबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 जानेवारी : आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात चहाप्रेमी आहेत. यातील बहुतेकांचा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही. त्याचबरोबर चहाबाबत प्रत्येकाची स्वतःची आवड असते. कुणाला ब्लॅक टी (Black Tea) आवडतो, तर कुणाला निरोगी राहण्यासाठी ग्रीन टी (Green Tea) प्यायला आवडतो. विशेषत: थंडीच्या काळात चहाची मागणी वाढते आणि या काळात काही लोक मसाला चहाचा (Masala Tea) आस्वाद आवर्जून (Herbal Tea For Winter) घेतात. सध्या कोरोनाचा कहर टाळण्यासाठी काढ्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यासह हिवाळा असल्यानं चहाची इच्छाही शिगेला पोहोचते. पण, आपला चहाच काढ्याचं कामही करू लागला तर चहा पिण्याचा आनंद द्विगुणित होईल ना? होय, काही नैसर्गिक घटकांच्या मदतीनं तुम्ही चहाला चवदार आणि फायदेशीर बनवू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 प्रकारच्या चहांबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 5 प्रकारचे हर्बल चहा (5 types of herbal tea) तुळशीचा चहा तुळशीची पानं (Tulsi leaves) कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय, तुळस कित्येक शतकांपासून आयुर्वेदाचा अविभाज्य भाग आहे. तेव्हा तुळशीची पानं तुमचा चहा चविष्ट बनवण्यासोबतच आरोग्यही चांगलं राखण्याचं काम करतील. काळा चहा काही लोक काळा चहा म्हणजेच ब्लॅक टीचे शौकीन असतात. तज्ज्ञांच्या मते, दुधासोबत चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो. त्यामुळं अनेकांना ब्लॅक टी प्यायला आवडतं. हा चहा स्वादिष्ट असण्यासोबतच घसा खवखवणं आणि जळजळणं यापासून आराम देतो. हे वाचा - Oral Hygiene Tips : घरच्या घरी असा तयार करा Mouthwash; तोंडाच्या दुर्गंधीची चिंता नको रहा Fresh ज्येष्ठमधाचा चहा ज्येष्ठमधाचा चहा हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आपल्याला घसा खवखवणं, खोकला आणि सर्दीसारख्या आणि मौसमी फ्लूपासून दूर ठेवतात. यासोबतच घशाचा बसलेला आवाजही याच्या सेवनानं चांगला होऊ लागतो. कॅमोमाइल चहा कॅमोमाइल चहा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचं काम करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचं काम करतात. हे वाचा - Avoid Pigmentation: चेहऱ्यावर सुरकत्या येणारच ना! त्यासाठी या चुका अगोदर टाळाव्या लागतील पुदिन्याचा चहा चहामध्ये पुदिना घालून त्याचं सेवन केल्यास सर्दी, खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. पुदिन्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक आढळतात. ते शरीराला इन्फेक्शन आणि फ्लूपासून सुरक्षित ठेवतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या