मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी पोहण्यासारखा व्यायाम नाही; योग्य वेळ आणि स्ट्रोक फक्त समजून घ्या

वजन कमी करण्यासाठी पोहण्यासारखा व्यायाम नाही; योग्य वेळ आणि स्ट्रोक फक्त समजून घ्या

पोहण्यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. धावण्याने तुम्ही जितके वजन कमी कराल तितकेच तुम्ही पोहण्याने वजन कमी करू शकता. मात्र, वेगात वजन कमी करण्यासाठी काही खास पोहण्याच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात, त्याविषयी जाणून (Swimming Benefits for Weight Loss) घेऊया.

पोहण्यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. धावण्याने तुम्ही जितके वजन कमी कराल तितकेच तुम्ही पोहण्याने वजन कमी करू शकता. मात्र, वेगात वजन कमी करण्यासाठी काही खास पोहण्याच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात, त्याविषयी जाणून (Swimming Benefits for Weight Loss) घेऊया.

पोहण्यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. धावण्याने तुम्ही जितके वजन कमी कराल तितकेच तुम्ही पोहण्याने वजन कमी करू शकता. मात्र, वेगात वजन कमी करण्यासाठी काही खास पोहण्याच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात, त्याविषयी जाणून (Swimming Benefits for Weight Loss) घेऊया.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 एप्रिल: उन्हाळ्यात पोहण्याची (Swimming) मजा काही औरच असते. विशेषत: सकाळ, संध्याकाळ तलावाच्या थंड पाण्यात पोहल्याने मूड फ्रेश होतो. पोहण्याने शरीराचा सर्व थकवा कमी होतो. याशिवाय पोहण्याचे अनेक आरोग्य फायदे (Swimming Benefits) आहेत, सर्वात महत्त्वाचा म्हणजे वजन कमी होणे. पोहण्यामुळे वेगात वजन कमी (Weight Loss) करता येते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्यांचे वजन जास्त आहे ते पोहण्याने आपले वजन कमी करू शकतात. पोहण्यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. धावण्याने तुम्ही जितके वजन कमी कराल तितकेच तुम्ही पोहण्याने वजन कमी करू शकता. मात्र, वेगात वजन कमी करण्यासाठी काही खास पोहण्याच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात, त्याविषयी जाणून (Swimming Benefits for Weight Loss) घेऊया.

अशा प्रकारे पोहून वजन कमी करा

सकस आहार आवश्यक

TOI मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही पोहण्याच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यासोबत हेल्दी फूड खावे लागेल. पोहण्यासाठी शरीराला भरपूर तग धरण्याची आणि उर्जेची गरज असते आणि या दोन्ही गोष्टी तुम्ही पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खाऊन मिळवू शकता. जास्त खाणे टाळा नाहीतर तुमच्या मेहनतीचा काही उपयोग होणार नाही. पोहण्याने वजन कमी करत असाल तर प्रोटीन शेक प्या. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

बटरफ्लाय स्विमिंग स्ट्रोक वापरून पहा

वजन कमी करण्यासाठी दररोज त्याच प्रकारे पोहू नका. यासाठी स्विमिंगचे वेगवेगळे स्ट्रोक करून पहावे लागतील. यासाठी तुम्ही जलतरण तज्ज्ञ किंवा वजन कमी करणाऱ्या प्रशिक्षकाचा सल्ला घेऊ शकता. स्विमिंग स्ट्रोकचे अनेक आरोग्य फायदे आहेत तसेच शरीरातील अतिरिक्त कॅलरी आणि चरबी जाळण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी बटरफ्लाय स्ट्रोक चांगला मानला जातो. जर तुम्ही हा स्ट्रोक 10 मिनिटे व्यवस्थित केला तर तुम्ही सुमारे 150 कॅलरीज बर्न करू शकता. यासोबतच एक तास फ्रीस्टाइल स्ट्रोक करून सुमारे 700 कॅलरीज बर्न करता येतात.

हे वाचा - पुरुषांनो तुमच्यासाठी धोक्याची आहे रात्र; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

वजन कमी करण्यासाठी पोहण्याची योग्य वेळ

जर तुम्हाला लवकर वेगात कमी करायचे असेल, तर पोहायला जाण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी, तीही नाश्ता करण्यापूर्वी. सकाळी पोहण्याने शरीरात जमा झालेली चरबी योग्य प्रकारे वापरली जाते. शरीर ऊर्जेसाठी जमा झालेली चरबी वापरते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

हे वाचा - Fasting : उपवास करणं खरंच आरोग्याला फायदेशीर आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

वेग, तीव्रता महत्त्वाची

तुम्हाला स्विमिंगद्वारे वजन कमी करायचे असेल तर हळूहळू पोहल्याने फायदा होणार नाही. यासाठी तुम्हाला वेग वाढवावा लागेल, तीव्रतेची काळजी घ्यावी लागेल, जास्त ताकद लावून पोहा. तुम्ही जितक्या वेगाने पोहता तितक्या जास्त कॅलरी बर्न कराल. वेग वाढवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कमी वेळेत शरीरातील अधिक चरबी कमी करून तुम्हाला तंदुरुस्त आणि स्मार्ट बॉडी मिळू शकेल.

First published:

Tags: Weight, Weight loss tips