Home /News /lifestyle /

त्वचा, हृदय विकारासह पचन व्यवस्था राहील निरोगी; या एका फळाचे आहेत अनेक फायदे

त्वचा, हृदय विकारासह पचन व्यवस्था राहील निरोगी; या एका फळाचे आहेत अनेक फायदे

एक मध्यम आकाराचं पीच 58 कॅलरीज ऊर्जा पुरवतं. पीचमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला वृद्धत्वापासून देखील वाचवतात. पीच जेवढं ताजं आणि पिकलेलं असेल, तेवढे त्यात अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : पीच हे एक आकारानं लहान मऊ असणारं फळ आहे. ते सफरचंदसारखं दिसतं. मात्र, हे फळ सफरचंदापेक्षा वेगळं असून त्याच्या आकारात थोडा फरक असतो. त्याचं वैज्ञानिक नाव Prunus persica आहे. असं मानलं जातं की 8 हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये पीचची उत्पत्ती झाली होती. हे फळ शरीराला अनेक रोगांपासून वाचवतं. पचन आणि त्वचेसाठी हे खूप चांगलं (Health Benefits of Peaches) फळ आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या क्रिममध्ये पीचचा वापर केला जातो. पीच तंतुमय पदार्थ (फायबर), जीवनसत्त्वं, खनिजं आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. याशिवाय, कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स), पोटॅशियम, नियासिन, तांबं, मॅंगनीजसारखी पोषक तत्त्वंदेखील आढळतात. एक मध्यम आकाराचं पीच 58 कॅलरीज ऊर्जा पुरवतं. पीचमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला वृद्धत्वापासून देखील वाचवतात. पीच जेवढं ताजं आणि पिकलेलं असेल, तेवढे त्यात अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हेल्थलाईन न्यूजच्या माहितीनुसार, एका अभ्यासात पीचचा रस (ज्यूस) घेतल्यानंतर त्यातील अँटीऑक्सिडंटस 30 मिनिटांनी परिणाम दर्शवू लागतात, असं सिद्ध झालंय. हे वाचा - घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा; पावसानं झालेलं नुकसान भरून निघण्याची अपेक्षा पीचचे फायदे पचनासाठी आहे लाभदायक एका मध्यम आकाराच्या पीचमध्ये 2 ग्रॅम तंतुमय पदार्थ असतात. यापैकी अर्धे अविद्राव्य (पाण्यात न विरघळणारे) आणि अर्धे विद्राव्य (विरघळणारे) असतात. यामुळं पोटातील सर्व प्रकारच्या पाचन समस्यांपासून आराम मिळतो. पोटात कृमींची (जंत) समस्या असो किंवा पोटदुखी असो, पीचमुळं या समस्यांमध्ये आराम पडतो. तज्ज्ञांच्या मते, 500 मिलीग्राम ओवा  आणि 125 मिलीग्राम हिंग 10-20 मिली पीचच्या रसात मिसळून घेतल्यानं पोटदुखीपासून आराम मिळतो आणि पोटाचे जंतही निघून जातात. पीच त्वचेला बनवतं चमकदार त्वचेच्या आरोग्यासाठी पीच खूप चांगलं आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्यावरील वार्धक्याचा प्रभाव दाखवणाऱ्या रेषा कमी करतात. एका अभ्यासात असं आढळून आलंय की, पीचमध्ये असलेली संयुगं चेहऱ्याच्या त्वचेचा ओलावा कायम ठेवतात. यामुळं त्वचेचं आरोग्य  सुधारतं. तसंच त्वचेचं अतिनील किरणांच्या प्रभावापासून संरक्षण होतं. उंदरांवर केलेल्या अभ्यासात असंही आढळून आलंय पीचमध्ये त्वचेच्या कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. पीचच्या गाभ्याच्या तेलाचा वापर त्वचेशी संबंधित रोगांमध्ये फायदेशीर आहे. हे वाचा - ”ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी” ; अभिनेत्रीचा साधा-सिंपल अंदाज पाहून चाहत्याने थेट घातली लग्नाची मागणी हृदयरोगाचा धोका होतो कमी पीचचं नियमित सेवन केल्यानं हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. पीचच्या सेवनानं उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते. एका अभ्यासात असं आढळून आलंय आहे की, पीच पित्ताशी (bile acids) संबंधित आजारांवर गुणकारी आहे. हे शरीरातून कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते. संधिवातामध्ये उपयुक्त संधिवात ही म्हातारपणी उद्भवणारी एक समस्या आहे. या रोगामुळं सांधे आणि गुडघ्यांमध्ये वेदना होतात. पीच स्टेमची साल बारीक करून सांध्यांवर लावल्यानं सांधेदुखीपासून आराम मिळतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या