मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'फक्त मनमोकळेपणाने बोला आणि ऐका'; म्हातारपणातही बुद्धी तल्लग ठेवण्याचा सोपा मंत्र

'फक्त मनमोकळेपणाने बोला आणि ऐका'; म्हातारपणातही बुद्धी तल्लग ठेवण्याचा सोपा मंत्र

Social interactions improve brain power :  सामाजिक संवादामुळे बुद्धी तल्लग होत अल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे.

Social interactions improve brain power : सामाजिक संवादामुळे बुद्धी तल्लग होत अल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे.

Social interactions improve brain power : सामाजिक संवादामुळे बुद्धी तल्लग होत अल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : साधारणपणे असे दिसून येते की वयाच्या साठीनंतर लोकांची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. त्यांच्यात संज्ञानात्मक समजही कमी होऊ लागतो. ते खूप लवकर गोष्टी विसरायला लागतात. पण ही समस्या तुम्हाला फक्त बोलण्याने (Talking) आणि ऐकण्याने (Listening) टाळता येईल. सामाजिक संवादामुळे बुद्धी तल्लग होत अल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे (Social interactions improve brain power).

तुमचे सामाजिक संबध चांगले असतील आणि समाजातील लोकांशी तुमचा चांगला संवाद असेल तर तुमची संज्ञानात्मक भावना दीर्घकाळ चांगली राहते. म्हणजेच तुम्ही लोकांमध्ये पटकन मिसळलात, त्यांच्याशी संवाद प्रस्थापित केलात, तर तुमचे मन दीर्घकाळ निरोगी राहील, असा दावा अलिकडील एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. जे लोक इतरांचे ऐकून घेऊ शकतात, इतरांच्या गोष्टींमध्ये रस घेतात, त्यांचे मानसिक स्वास्थ्य वृद्धापकाळापर्यंत चांगले राहते.

HT च्या बातमीनुसार, अभ्यासात असे समोर आले आहे की, जर आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात समाजाप्रती सकारात्मक दृष्टीकोन असेल आणि इतरांच्या प्रश्नांमध्ये रस घेतला असेल, तर तुमचा मेंदू वृध्दापकाळापर्यंत चांगला आणि संज्ञानात्मक राहू शकतो. जे लोक चांगले श्रोते (good listener) आहेत, त्यांना अल्झायमरसारखे (Alzheimer) न्यूरोलॉजिकल रोग होण्याची शक्यता कमी असते. हा अभ्यास जामा नेटवर्क ओपनमध्ये (JAMA Network Open) प्रकाशित झाला आहे.

हे वाचा - Toothache: थंडीत होणाऱ्या दातदुखीमुळं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय लगेच देतील आराम

या अभ्यासात, अमेरिकेच्या फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडी (FHS) मध्ये 2,171 लोकांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांचे सरासरी वय सुमारे 63 वर्षे होते. या दीर्घकालीन अभ्यासात सहभागींच्या मेंदूशी संबंधित विविध माहिती गोळा करण्यात आली. या अभ्यासात सहभागी लोकांच्या सामाजिक संपर्कात होते का, त्यांनी लोकांचे कसे ऐकले, चांगला सल्ला दिला की नाही, त्यांच्या जीवनात प्रेम आणि भावनेचे महत्त्व, जे भावनिक होते, त्यांच्याशी संपर्क कसा होता याचा शोध घेण्यात आला? या सर्व प्रश्नांचे विश्लेषण केल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, जे लोक इतरांशी अधिक सामाजिक संबंध ठेवतात आणि लोकांचे गांभीर्याने ऐकतात, त्यांचा मेंदू वृद्धापकाळापर्यंत चांगल्या स्थितीत राहतो. त्यांची स्मरणशक्तीही चांगली राहते.

हे वाचा - त्वचेपासून ते केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने; जाणून घ्या या पद्धती

संशोधकांना असे आढळून आले आहे की, जर तुम्हाला असे वाटत असेल की एखाद्याशी नेहमी बोलण्याची गरज आहे किंवा ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता आणि आरामात ऐकू शकता, असा संवाद ठेवल्याने संज्ञानात्मक समजण्याची क्षमता वाढते. मेंदूचे कार्य अधिक चांगले व्हावे, यासाठी हा चांगला उपाय आहे. मेंदूतील कोणत्याही प्रकारचा आजार आणि त्यावर होणारा वयाचा प्रभाव कमी करण्यासही हे काम उपयुक्त ठरते.

First published:

Tags: Health, Mental health