Home /News /lifestyle /

Spiny Gourd Benefits : तुम्ही कधी कर्टूल्याची भाजी खाल्लीय का? आरोग्यासाठी आहेत इतके सारे फायदे

Spiny Gourd Benefits : तुम्ही कधी कर्टूल्याची भाजी खाल्लीय का? आरोग्यासाठी आहेत इतके सारे फायदे

Spiny Gourd Benefits: कर्टूल्याची भाजी खूपच ताकदवर्धक मानली जाते. त्यामुळे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे मिळतात. याला काकोडा किंवा गोड कारलं असेही म्हणतात.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : चांगली चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या खाण्याकडं अनेकांचा कल असतो. अशा तुम्ही भरपूर भाज्या खाल्ल्या असतील. पण तुम्ही कधी कर्टूलं किंवा काटोलाची (Spiny Gourd) भाजी खाल्ली आहे का? आणि तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? कारण कर्टूलंची भाजी खूपच ताकदवर्धक मानली जाते. त्यामुळे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे मिळतात. याला काकोडा किंवा गोड कारलं तसंच काटूल असेही म्हणतात. चला तर जाणून घेऊया कर्टूलाची भाजी खाण्याचे (Spiny Gourd Benefits ) फायदे.. वजन कमी करण्यास उपयुक्त कर्टूलंची भाजी वजन कमी करण्यास मदत करते. कर्टूलंमध्ये प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात असताच. परंतु, कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. जर तुम्ही 100 ग्रॅम कर्टूलंचे सेवन केलं तर त्यातून तुम्हाला फक्त 17 ग्रॅम कॅलरीज मिळतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कर्टूलंची मदत घेऊ शकता. पचन सुधारते पचनक्रिया सुधारण्यातही कर्टूलं चांगली भूमिका बजावते. कर्टूलं हे आयुर्वेदात औषध मानलं जातं, ज्याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. कर्टूलं तुम्ही फक्त भाजी म्हणून नाही तर लोणचे म्हणूनही खाऊ शकता. रोग दूर ठेवते कर्टूलं हा फायटोन्यूट्रिएंट्सचा एक उत्तम स्रोत आहे, जो फक्त काही वनस्पतींमध्ये आढळतो. हा पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. रोगांपासून बचाव करण्यासाठी हे खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. हे वाचा - VIDEO: ‘आता ही पुन्हा कोरोना आणणार…’, घराच्या छतावर विंचूची शेती करताना दिसली चायनीज मुलगी अ‌ॅलर्जी कमी करते कर्टूलं ही अँटी-अॅलर्जिक भाजी मानली जाते. ही भाजी साधारणपणे पावसाळ्यातच येते. त्याच्या अँटी-एलर्जीन आणि वेदनाशामक गुणधर्मांमुळे, हे हंगामी खोकला, सर्दी आणि इतर अ‌ॅलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी उपयोगी आहे. मधुमेहावरही गुणकारी मधुमेहाची समस्या कमी करण्यासाठीही कर्टूलं उपयुक्त ठरतो. याच्या सेवनाने मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. कारण या वनस्पतीमध्ये इन्सुलिन भरपूर प्रमाणात असते. हे वाचा - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार? सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी त्वचेवर चमक त्वचेला निरोगी ठेवण्यासाठीही काटूल खूप मदत करते. त्यात बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या विविध फ्लेव्होनॉइड्स असतात. ते त्वचेसाठी संरक्षक कवच म्हणून काम करतात. याच्या वापराने त्वचेवर चमक येते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती विविध स्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या