Home /News /lifestyle /

Spinach Side Effects: आरोग्यदायी आहे म्हणून जास्त पालक खाऊ नका; त्याचे दुष्परिणाम एकदा जाणून घ्या

Spinach Side Effects: आरोग्यदायी आहे म्हणून जास्त पालक खाऊ नका; त्याचे दुष्परिणाम एकदा जाणून घ्या

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालकाचे अधिक सेवन केल्याने आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी त्रास सहन करावा लागू शकतो. जाणून घेऊया पालकाच्या अतिसेवनाचे तोटे काय आहेत त्याविषयी..

    नवी दिल्ली, 21 मे : हिरव्या भाज्या हा प्रत्येकाच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक आहारतज्ज्ञ हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पोषक घटकांनी समृद्ध भाज्यांमध्ये पालकचे नाव अग्रस्थानी आहे. पालक हे प्रथिने तसेच लोह, जस्त आणि तांबे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पण healthshots.com ने दिलेल्या माहितीनुसार पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या आरोग्याला हानीदेखील (Spinach Side Effects) पोहोचू शकते. अनेकदा आपण अधिक पोषक द्रव्ये घेण्याच्या लोभापोटी एखाद्या गोष्टीचे जास्त सेवन करतो. पण, एका ठराविक मर्यादेनंतर प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी घातक ठरू शकते आणि पालकही त्यापेक्षा वेगळा नाही. तज्ज्ञांच्या मते, पालकाचे अधिक सेवन केल्याने आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी त्रास सहन करावा लागू शकतो. जाणून घेऊया पालकाच्या अतिसेवनाचे तोटे काय आहेत. किडनी स्टोन - पोषक तत्वांनी समृद्ध असण्यासोबतच पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड देखील भरपूर असते. म्हणूनच पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात कॅल्शियम-ऑक्सालेट तयार होते, ज्यामुळे मुतखडा (किडनी स्टोन) होऊ शकतो. कॅल्शियमवर परिणाम - खरे तर पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. पालक जास्त खाल्ल्याने शरीरातील ऑक्सॅलिक अॅसिडचे प्रमाण वाढते आणि हे अॅसिड कॅल्शियमशी जोडले जाते. त्यामुळे आतड्यांमध्ये ऑक्सलेट तयार होतो, ज्यामुळे कॅल्शियमवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता दिसून येते. मुलांसाठी हानिकारक ठरू शकते - पालक जास्त खाणे मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक, पालकामध्ये नायट्रेट्स असतात, ज्याचा सामान्यतः प्रौढ लोकांच्या पचनसंस्थेवर परिणाम होत नाही, परंतु ते मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. हे वाचा -  भारतात Omicron BA.4 चा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ; किती घातक आहे हा स्ट्रेन? औषधांमुळे ऍलर्जीचा धोका - मधुमेहाचे औषध घेणार्‍या लोकांसाठी पालकाचे अधिक सेवन करणे धोकादायक ठरू शकते. वास्तविक, पालकामध्ये व्हिटॅमिन 'के' मुबलक प्रमाणात आढळते. जे औषधांवर वेगळ्या रिअ‌ॅक्शन देऊ शकतात आणि रक्ताच्या गुठळ्या तयार करू शकतात. मधुमेहावरील औषधामुळे रक्तदाब कमी होतो आणि पालकमध्ये असलेले व्हिटॅमिन के औषधासोबत एकत्र मिक्स होऊ शकते आणि रक्तदाब खूप कमी होण्याची भीती असते. हे वाचा - Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला पोटदुखीची होऊ शकते - पोषक तत्वांनी समृद्ध असण्यासोबतच पालकामध्ये फायबर देखील भरपूर असते. म्हणूनच पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील फायबर वाढते. त्यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी, क्रॅम्प्स आणि पोट फुगणे यासारख्या समस्या दिसून येतात आणि पोटदुखी सतत होऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या