नवी दिल्ली, 23 मे : कमी प्रथिनेयुक्त आहार (Low Protein Diet) घेतल्यास यकृतामध्ये फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर 21 (FGF21) हार्मोनची भरपूर वाढ होते. हा हार्मोन उत्तम आरोग्य राखण्यास आणि तंदुरुस्तीसह दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करतो. अमेरिकेतील लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीच्या (Louisiana State University) संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हा हार्मोन शरीरातील ग्लुकोजचे विघटन रोखतो आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतो. त्यामुळे वजन वेगाने वाढत नाही. दुसर्या टीमला त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, हा हार्मोन अँटी-एजिंग इफेक्ट वाढवण्याचे काम करतो. कमी प्रथिने आणि कर्बोदकांनी समृद्ध आहार घेणे चयापचय आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.
हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स FGF21 चा चांगला प्रवाह वाढवण्यास फायदेशीर आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशनमध्ये (Nature Communications) प्रसिद्ध झाले आहेत.
अभ्यास कसा झाला?
सध्या हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला आहे. अभ्यासादरम्यान, कमी प्रथिनयुक्त आहार असलेल्या उंदराच्या जनुकाशी सामान्य उंदराची जुळवाजुळव केली असता, असे आढळून आले की, सामान्य उंदीर गुबगुबीत आणि म्हातारा दिसतो.
प्रतिबंधित प्रथिनांचे सेवन उंदरांचे आयुष्य कसे सुधारू शकते, याचे संभाव्य स्पष्टीकरण या अभ्यासाचे निष्कर्ष म्हणून स्पष्ट होतात. परंतु, हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा अभ्यास फक्त नर उंदरांवर केंद्रित होता. मादी उंदराच्या आहारास लवकर प्रतिसाद देऊ शकत नाहीत. तरीसुद्धा, कमी प्रथिनेयुक्त आहाराचे फायदेशीर परिणाम नियंत्रित करणारे एकल हार्मोन ओळखण्याचा हा पहिला अभ्यास आहे.
हे वाचा - Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी
तज्ज्ञ काय म्हणतात
लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट ख्रिस्तोफर मॉरिसन (neuroscientist Christopher Morrison ) यांनी स्पष्ट केले की FGF21 संप्रेरक मेंदूशी संवाद साधते आणि उंदीर कमी प्रथिनेयुक्त आहार घेत आहे, असे जाणवू देत नाही. त्यामुळे उंदराच्या चयापचय आणि वर्तनात कोणताही बदल होत नाही. मानवापूर्वी उंदरांवर प्रयोग केले गेले.
हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या
कमी प्रथिने आहार कोणता? -
सुका मेवा वगळता सर्व फळे
मटार, बीन्स आणि कॉर्न वगळता सर्व भाज्या
हेल्दी फॅट्स ऑलिव्ह ऑईल आणि एवोकॅडो यासारखे फॅट्सचे अनेक स्रोत
औषधी वनस्पती आणि मसाले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips