मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी इडली-डोसा बेस्ट! साउथ इंडियन Low कॅलरी पदार्थांचा डाएटिशियन का देतात सल्ला?

वजन कमी करण्यासाठी इडली-डोसा बेस्ट! साउथ इंडियन Low कॅलरी पदार्थांचा डाएटिशियन का देतात सल्ला?

दक्षिण भारतीय पदार्थ (Low calories South Indian breakfast )चवदार असण्यासोबत आरोग्यदायी असतात. विशेषत: कमी कॅलरी प्रथिनेयुक्त अन्न असल्यानं दक्षिण भारतीय पदार्थ (South Indian Dishes) आहारात घेणं वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय (Weight Loss Diet) ठरू शकतं.

दक्षिण भारतीय पदार्थ (Low calories South Indian breakfast )चवदार असण्यासोबत आरोग्यदायी असतात. विशेषत: कमी कॅलरी प्रथिनेयुक्त अन्न असल्यानं दक्षिण भारतीय पदार्थ (South Indian Dishes) आहारात घेणं वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय (Weight Loss Diet) ठरू शकतं.

दक्षिण भारतीय पदार्थ (Low calories South Indian breakfast )चवदार असण्यासोबत आरोग्यदायी असतात. विशेषत: कमी कॅलरी प्रथिनेयुक्त अन्न असल्यानं दक्षिण भारतीय पदार्थ (South Indian Dishes) आहारात घेणं वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय (Weight Loss Diet) ठरू शकतं.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : भारताच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ खाल्ले जातात. यामुळेच भारत हे खाद्य पदार्थांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची (Food) एक लांबलचक यादी तयार करता येते. या यादीत दक्षिण भारतीय पदार्थांचीही (South Indian Dishes) नावं आहेत. इडली, सांबार, रसम, भात आणि डोसा हे दक्षिण भारतीय पदार्थ बहुतेक लोकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, दक्षिण भारतीय पदार्थ चवदार असण्यासोबत आरोग्यदायी असतात. विशेषत: कमी कॅलरी प्रथिनेयुक्त अन्न असल्यानं दक्षिण भारतीय पदार्थ (South Indian Dishes) आहारात घेणं वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय (Weight Loss Diet) ठरू शकतं. आज आपण दक्षिण भारतीय पदार्थांच्या डाएट चार्ट विषयी जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू (Weight Loss Diet Chart) शकता.

पहाटे

रोज सकाळी एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत राहण्यासोबतच दिवसाची सुरुवातही उत्साही राहते. याशिवाय तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता.

नाश्ता

अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी जीवनशैलीसाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. सकाळच्या निरोगी आणि चवदार नाश्त्यासाठी, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांइतका चांगला पर्याय नाही. यासाठी तुम्ही बार्ली इडली, सांबार, अंडी, पोंगल, शेंगदाणे आणि नारळाची चटणी नाश्त्यामध्ये खाऊ शकता.

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणात तुम्ही 2 नाचणीचे गोळे, भाज्यांची करी, ताक, सांबार, भात, कोशिंबीर यांसारखे पदार्थ खाऊ शकता. भरपूर प्रमाणात पोषक असण्यासोबतच हे पदार्थ सहज पचतात. त्यामुळे पोटही पूर्णपणे निरोगी राहते.

हे वाचा - Tips to Reduce Belly Fat: ताबडतोब बदलायला हव्यात या सवयी; वजन कमी होण्याऐवजी वाढतंच राहतं

संध्याकाळचा नाश्ता

अनेकांना संध्याकाळच्या वेळी जेवणाची तीव्र इच्छा होऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफीसोबत मल्टीग्रेन बिस्किटे किंवा पिस्ता खाऊ शकता. ग्रीन टी चयापचय नियंत्रित करून शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते.

रात्रीचे जेवण

तज्ज्ञांच्या मते रात्रीचे जेवण हलके असावे, जे सहज पचता येईल. रोटी व्यतिरिक्त, तुम्ही मिश्रीत मसूर, पालक डाळ, दही, भाजीपाला करी, मसूर, मिक्स्ड व्हेज, ब्राऊन राइस, स्प्राउट सॅलड, केरळ स्टाईल मासे देखील घेऊ शकता.

हे वाचा - Fennel For Weight Loss: डाएट प्लॅन-व्यायामानंही वजन घटेना, या पद्धतीनं बडीशेप वापरून पाहा परिणाम

झोपण्यापूर्वी

दररोज झोपण्यापूर्वी एक कप कोमट हळदीचे दूध प्यायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास कधी कधी केळीसोबत बदामाचे दूध पिऊ शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips