• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Face Care Tips : घरच्या घरी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल; हे चार उपाय आहेत फायदेशीर

Face Care Tips : घरच्या घरी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल; हे चार उपाय आहेत फायदेशीर

Face Care Tips : रासायनिक क्रीम आणि विविध सौदर्य प्रसाधनांपेक्षा तुम्ही घरच्या-घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून चेहऱ्याची त्वचा अधिक चांगली बनवू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : जर तुम्हाला चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स काढून नैसर्गिक चमक मिळवायची असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. या बातमीमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा चार टिप्स घेऊन (Face Care Tips) आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्हाला चमकदार त्वचा (Skin) मिळू शकते. या पाककृती दूध, केशर आणि हळद आणि चंदन लावून तयार केल्या जातात. चेहऱ्याचे सौंदर्य असे वाढवा - 1. मोहरी मोहरी पावडर आणि मोहरीचे तेल पूर्वीच्या काळात उटणं म्हणून वापरले जात होते. त्वचेला त्याच्या उटण्यानं मसाज करून टॅनिंग काढता येते. 2. केशर केशर दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते, असे त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर दूध आणि चंदनासह केशर वापरल्यास टॅनिंग देखील काढून टाकता येते. हे वाचा - दारूच्या नशेत केलं लग्न, शुद्धीत आल्यावर पत्नीनं मागितला घटस्फोट; पती हसला आणि म्हणाला… 3. दूध कच्च्या दुधाच्या मालिशने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात. दुधानं मालिश केल्यानं त्वचेचे चिकटलेली छिद्रं पुन्हा खुली होण्यास मदत होते. त्यामुळं त्वचा अधिक नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ आणि मॉइश्चराइझ होते. हे वाचा - India Fights Corona : भारत विक्रमी 100 कोटी लसीकरणाच्या अगदी जवळ; या आठवड्यात घडेल इतिहास 4. हळद चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळ आणि ब्लॅक हेड्स बरे करण्यासाठी हळदीचा वापर गुणकारी ठरतो. चंदन, दूध, मलई आणि मधात हळद मिसळून फेसपॅक म्हणून वापर करता येतो, यामुळे नैसर्गिक चमक वाढते.
  Published by:News18 Desk
  First published: