मुंबई, 29 ऑक्टोबर : मनुका हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बेदाण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे मनुका. मनुके हे द्राक्षे सुकवून तयार केले जातात. मनुक्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. याशिवाय मनुक्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. मनुके चवीला अतिशय गोड आणि साखरेनं भरलेली असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. आयुर्वेदात मनुक्यांचा उपयोग पोटाचे विकार, अशक्तपणा, रक्ताची कमतरता इत्यादींवर औषध म्हणून केला जातो. मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेवरही मात करता येते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही मनुका खूप फायदेशीर आहे. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मनुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आज आपण भिजवलेल्या मनुक्यांच्या फायद्यांविषयी (Soaked raisins benefits) जाणून घेऊया.
पाण्यात मनुके कसे भिजवायचे
रात्री 4-5 मनुके चांगले धुवा आणि एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी फुगलेले मनुके पाण्यातून गाळून वेगळे करा. उरलेले पाणी अनोशा पोटी प्या. यानंतर तुम्ही भिजवलेले मनुकेही खाऊ शकता.
भिजवलेल्या मनुक्यांचे फायदे
वजन कमी करण्यास उपयुक्त
मनुक्यांमध्ये पूर्णपणे नैसर्गिक साखर आहेत. त्यात फॅट अजिबात नाही. सकाळी आणि रात्री मनुके खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही. यासोबतच यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीराला ग्लुकोजच्या रूपात ऊर्जा देत राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
पचन सुधारते
मनुक्यामध्ये भरपूर फायबर आढळते. जेव्हा ते पाण्यात भिजवले जाते तेव्हा त्यातील फायबरचे प्रमाण आणखी वाढते. पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. याशिवाय सकाळी याच्या सेवनाने अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
हे वाचा -
तोंडात तंबाखू असल्याने नीट साक्ष दिली नाही; संतापलेल्या न्यायाधीशांनी ठोठावला दंड
रक्तदाब संतुलित राहतो
मनुक्यामध्ये पोटॅशियम आढळते, जे शरीरातील मीठाचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करते. त्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येत नाही आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हे वाचा -
शेअर बाजारात आठवडाभरात गुंतवणूकदारांचे 4.82 लाख कोटी बुडाले; आजही बाजारात घसरण
थकवा दूर होतो
जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा भिजवलेले मनुके खा. त्यामुळे थकवा खूप लवकर कमी होईल. कारण मनुके ही ग्लुकोज आणि फ्रक्टोजचा नैसर्गिक स्रोत आहेत. याचे संतुलित प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो आणि वजनही वाढू शकते. रोज सकाळी मनुक्याचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडीटी आणि थकवा यापासून आराम मिळतो. केसगळती रोखण्यासाठीही मनुका उपयुक्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.