Home /News /lifestyle /

अ‌ॅसिडिटी, मान, पाठदुखी होत असताना अशा पोझिशनमध्ये झोपून बघा; त्रास कमी होतो

अ‌ॅसिडिटी, मान, पाठदुखी होत असताना अशा पोझिशनमध्ये झोपून बघा; त्रास कमी होतो

झोप नीट न लागण्याला वेगवेगळ्या प्रकारे झोपणे हे देखील एक कारण असू शकते. याशिवाय अशी काही कारणे आहेत, ज्यांमुळे लोकांची झोप कमी होते. उदाहरणार्थ, पाठ किंवा मान दुखणे, घोरणे किंवा पोटातील आम्ल. सर्वसाधारणपणे उद्भवणाऱ्या अशा समस्यांवर वैज्ञानिक पद्धतींनी मात (Sleeping Position) करता येते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 29 एप्रिल : चांगली झोप घेणे हा उत्तम आरोग्याचा पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे. पण, कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. याला खाण्या-पिण्याच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावाशिवाय आणखी एक कारण असू शकते आणि ते म्हणजे झोपण्याची पद्धत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, 57 टक्के लोक एका कुशीवर झोपतात. 17 टक्के लोक पाठीवर झोपतात. 11 टक्के लोक पालथे-पोटावर झोपतात आणि 15 टक्के लोक असे असतात, ज्यांची झोपण्याची स्थिती सतत बदलत असते. झोप नीट न लागण्याला वेगवेगळ्या प्रकारे झोपणे हे देखील एक कारण असू शकते. याशिवाय अशी काही कारणे आहेत, ज्यांमुळे लोकांची झोप कमी होते. उदाहरणार्थ, पाठ किंवा मान दुखणे, घोरणे किंवा पोटातील आम्ल. सर्वसाधारणपणे उद्भवणाऱ्या अशा समस्यांवर वैज्ञानिक पद्धतींनी मात (Sleeping Position) करता येते. घोरण्याची सवय असेल तर काय करावे? झोपताना घोरायला होत असल्यास पाठीवर न झोपता एका कुशीवर किंवा पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत झोपल्याने जीभ आणि ऊती (पेशी) घशाला चिकटत नाहीत. घशात जीभ चिकटल्याने श्वास थांबतो, त्यामुळे घोरणे होते. मान दुखी - मानदुखीमुळे संपूर्ण रात्र अस्वस्थतेत काढावी लागत आहे. अशावेळी पोटावर झोपणे टाळा. मानेखाली एकापेक्षा जास्त उशी ठेवू नका. लक्षात ठेवा की उशीची उंची खांद्याच्या वर असावी. कधी कधी टॉवेल गुंडाळल्यानेही मानदुखीत आराम मिळतो. पाठदुखी - रात्रीच्या वेळी पाठदुखी हे देखील झोपेच्या त्रासाचे एक महत्त्वाचे कारण बनते. अशावेळी पाठीवर झोपा आणि गुडघ्याखाली उशी ठेवा. असं केल्यानं मणका नैसर्गिकरित्या वक्र राहतो. शरीरावरील ताण कमी होतो. अधिक आरामासाठी टॉवेल देखील कमरेला गुंडाळून ठेवू शकता. हे वाचा - दुधात गुलकंद घालून प्या; उन्हाळ्यातील जबरदस्त हेल्दी ड्रिंक्स, फ्रेश होईल मूड अ‌ॅसिडिटीमध्ये काय करावे - काही वेळा चुकीच्या पद्धतीनं खाल्ल्यामुळे होणारी ऍसिडिटी आपल्याला रात्रभर झोपू देत नाही. अशा स्थितीत झोपताना डोक्याखाली उंच उशीचा वापर करावा. यात काही अडचण असल्यास पलंगाखाली थोडा आधार ठेवा आणि डोकं वर राहील याची काळजी घेऊन एका कुशीवर झोपा. खांदा दुखणे - खांदा दुखत असेल तर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. त्यावेळी पाठीवर झोपा. जर तुम्हाला एका कुशीवर झोपायचे असेल, तर छातीच्या उंचीएवढी उशी ठेवा, दुखणारा खांदा उशीवर ठेवा. एखाद्या व्यक्तीला मिठी मारल्यासारखा उशीवर दाब ठेवा. हे वाचा - दुधात गुलकंद घालून प्या; उन्हाळ्यातील जबरदस्त हेल्दी ड्रिंक्स, फ्रेश होईल मूड पायात गोळे येत असतील तर- पायात गोळे येवून पिंडऱ्या दुखत असतील तर आपल्याला रात्री नीट झोप लागत नाही. असा त्रास होत असल्यास झोपण्यापूर्वी गोळे येत असलेल्या ठिकाणी मालिश करा. हलके स्ट्रेच करा. तरीही, वेदना कायम राहिल्यास आपण हीटिंग पॅड वापरू शकता, आराम वाटेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर अवलंबून आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या