मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Black sesame : हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे आहेत अनेक फायदे; त्वचा, केसांच्या समस्यांवरही गुणकारी

Black sesame : हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे आहेत अनेक फायदे; त्वचा, केसांच्या समस्यांवरही गुणकारी

Black sesame improves skin and hair : काळ्या तिळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Black sesame improves skin and hair : काळ्या तिळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Black sesame improves skin and hair : काळ्या तिळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : हिवाळ्यात काळ्या तिळाचे सेवन त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, काळ्या तिळामध्ये आयर्न, झिंक, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचा आणि केसांच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतात. काळे तीळ हे पौष्टिकतेने समृद्ध अन्नपदार्थ आहे. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज, लोह, जस्त, सॅच्युरेटेड फॅट, मोनोसॅच्युरेटेड फॅट इत्यादी (Black sesame improves skin and hair) काळ्या तिळांमध्ये आढळतात.

काळ्या तिळाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेवरही मात करता येते. काळ्या तिळाचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जातो. तिळाची लागवड भारतात मुबलक प्रमाणात केली जाते. तीळ लाडू असोत की तिळाची चिक्की, हिवाळ्यात ते खूप आवडीने खाल्ले जाते. चला तर मग जाणून घेऊया काळे तीळ खाण्याचे आणखी फायदे आहेत.

काळ्या तिळाचे फायदे

निरोगी केस आणि त्वचेसाठी

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, काळ्या तिळांमध्ये हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांचे दुष्परिणाम रोखण्याची क्षमता आहे. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे केवळ सनबर्नच होत नाही तर त्वचेवर सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व देखील येते. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळेही कर्करोग होऊ शकतो. दुखापतीनंतर तिळाच्या तेलाने मसाज केल्याने दुखण्यात खूप आराम मिळतो, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. काळे तीळ केस आणि त्वचा निरोगी ठेवतात असेही या अभ्यासात आढळून आले आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

काळ्या तिळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. हे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते. दीर्घकालीन ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग देखील होऊ शकतो. सामान्य तिळांमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्याची क्षमता असली तरी, काळ्या तिळामध्ये ते अधिक असते.

हे वाचा - IndiGo Recruitment: इंडिगो एअरलाईन्समध्ये इंजिनिअर्ससाठी होणार पदभरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

रक्तदाब संतुलित करण्यासाठी

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज 3.5 ग्रॅम काळे तीळ खाल्ल्यास चार आठवड्यांत रक्तदाब कमी होतो. याशिवाय काही रिसर्च पेपर्समध्ये असेही म्हटले गेले आहे की, ब्लड प्रेशर सुधारण्यात काळ्या तिळाची महत्त्वाची भूमिका आहे. तिळामध्ये असलेले कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम हृदयाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठता बरे करण्यासाठी

काळ्या तिळामध्ये भरपूर फायबर आणि असंतृप्त चरबी असते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी करण्यास उपयोगी आहे. काळ्या तिळाचे तेल पोटातील जंत काढून टाकण्यास मदत करते आणि पचनशक्ती मजबूत करते.

हे वाचा - वाह! 7 वर्षांच्या मुलानं सुरु केली बँक, झाले 2000 सदस्य; काम बघून वाटेल अभिमान

हाडे मजबूत करण्यासाठी

तिळामध्ये कॅल्शियम, आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात, जे हाडांची ताकद वाढवण्यास मदत करतात. हे केवळ हाडे मजबूत करण्याचे काम करत नाही तर स्नायूंसाठी देखील फायदेशीर आहे.

First published:

Tags: Health Tips, Winter session