• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Nail Polish: मुलांना तुम्ही नेल पॉलिश लावताय का? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

Nail Polish: मुलांना तुम्ही नेल पॉलिश लावताय का? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

Side Effects of Nail Polish : कधी कधी त्यांच्या हट्टामुळं तुम्ही स्वतःही त्यांच्या नखांना नेलपॉलिश लावलं असेल. मुलांसाठी आणि तुमच्यासाठी हा गमतीचा विषय असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, की नेलपॉलिशमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो?

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : अनेकवेळा तुम्ही लहान मुलांना हाताच्या आणि पायाच्या नखांना नेलपॉलिश लावताना पाहिलं असेल. कधी कधी त्यांच्या हट्टामुळं तुम्ही स्वतःही त्यांच्या नखांना नेलपॉलिश लावलं असेल. मुलांसाठी आणि तुमच्यासाठी हा गमतीचा विषय असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, की नेलपॉलिशमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो? आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नखांना नेलपॉलिश लावणं सुरक्षित आहे की नाही, याविषयी सांगणार (Side Effects of Nail Polish) आहोत. वास्तविक, नेलपॉलिश बनवताना सर्वाधिक हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. लहान मुलांना तोंडात हात नेण्याची किंवा नखं ​चावण्याची सवय असते. तेव्हा नेलपॉलिशमध्ये असलेली रसायनं मुलांच्या तोंडातून पोटात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया नेलपॉलिशमध्ये कोणती रसायनं वापरली जातात आणि त्यांच्यामुळं कोणत्या समस्या उद्भवू शकतात. हायड्रोक्विनोन नेलपॉलिशमध्ये असलेलं हायड्रोक्विनोन नावाचं रसायन डोळ्यांच्या संपर्कात आल्यास कॉर्नियाचं नुकसान करू शकतं. इतकंच नाही तर, याच्या वासामुळं नाक, घसा आणि वरच्या श्वसनमार्गामध्ये जळजळ होऊ शकते. फॉर्माल्डिहाइड नेलपॉलिशमध्ये वापरल्या जाणार्‍या फॉर्मल्डिहाइड रसायनामुळं मायलॉइड ल्युकेमिया होऊ शकतो. हा असा कर्करोग आहे, जो अस्थिमज्जा (Bone Marrow), लाल रक्तपेशी (Red Blood Cells), पांढऱ्या रक्त पेशी (White Blood Cells) आणि प्लेटलेट्समध्ये (Platelates) असामान्यपणे विकसित होतो. हे वाचा - T20 World Cup: संपूर्ण स्पर्धेची मेहनत 3 बॉलमध्ये वाया, एका मॅचमध्ये झाला हिरो ते व्हिलन प्रवास अ‌ॅक्रेलेट्स नेलपॉलिश बनवण्यासाठी अ‌ॅक्रेलेट नावाचं रसायनही वापरलं जातं. या रसायनाच्या वासमुळं आणि त्वचेच्या संपर्कात आल्यामुळं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मिथाइल मेथाक्रेलेटच्या संपर्कात असलेल्यांना आतडं, पोट किंवा गुदाशयामध्ये कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका असतो. कार्बन ब्लॅक कार्बन ब्लॅक नावाची काळी पावडर नेलपॉलिश बनवण्यासाठी वापरली जाते. त्याच्या संपर्कात आल्यानं फुफ्फुसांशी संबंधित समस्यांचा धोका असतो. हे वाचा - कोविड -19 विरूद्ध असलेली Covaxin लसही 77.8% प्रभावी, लॅन्सेटच्या अभ्यासात माहिती उघड टोल्यूइन नेलपॉलिश लावल्यानंतर ते लवकर सुकण्यासाठी त्यात टोल्युइन नावाचं रसायन वापरलं जातं. NCBI वर उपलब्ध संशोधनानुसार, यामुळं न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होऊ शकतात. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. हिंदी न्यूज18 याची पुष्टी करत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
  Published by:News18 Desk
  First published: