नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : तुळशीच्या पानांमध्ये (tulsi leaves) अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार, तुळशीच्या पानांचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदेशीर आहे. परंतु, तुळशीच्या पानांचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे. तुळशीच्या पानांचे (tulsi leaves side effect) जास्त प्रमाणात सेवन करणं धोकादायकही ठरू शकतं.
दातांच्या समस्या
तुळशीच्या पानांमध्ये पाऱ्याचे प्रमाण असते. जेव्हा तुम्ही पानं चघळता तेव्हा हे घटक बाहेर पडतात आणि त्यामुळे तुमच्या दातांचे नुकसान होते. तुळशीची पाने आम्लयुक्त असतात आणि जर तुम्ही ती रोज जास्त प्रमाणात चघळली तर दाताच्या इनॅमलवर परिणाम होऊ शकतो.
प्रजननक्षमतेवर परिणाम
तुळशीचे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर आहे, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, तुळशीच्या पानांमध्ये प्रजननविरोधी गुणधर्म आढळतात. तुळशीची पाने जास्त खाल्ल्यास शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.
हे वाचा - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला FB मित्राने मुलाखतीच्या नावाने बोलावलं आणि केला बलात्कार
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी
ज्या महिला गरोदर आहेत आणि स्तनपान करत आहेत, त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच तुळशीच्या पानांचे सेवन करावे. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय तुळशीची पाने खाल्ल्यानेही नुकसान होऊ शकते.
मधुमेहाच्या समस्येमध्ये
जर तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल तर तुळशीच्या पानांचे सेवन करू नका. तुळशीच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात, परंतु तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर तज्ञांच्या सल्ल्यानेच तुळशीच्या पानांचे सेवन करावे.
हे वाचा - बाथरुममध्ये छुपा कॅमेरा पाहून हादरली महिला, 3 वर्षांपासून प्लंबरचा सुरू होता घृणास्पद प्रकार
याची काळजी घ्या
आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये रक्त गोठणे दूर करण्याचा गुणधर्म आहे, परंतु जर तुम्हाला रक्त गोठण्याची समस्या येत नसेल आणि तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर तुळशीच्या पानांचे जास्त सेवन करू नका. यामुळे रक्त अधिक पातळ होऊ शकते.
(सूचना : ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips