मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Banana Side effects: या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत केळी, आरोग्यावर होईल उलटा परिणाम

Banana Side effects: या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत केळी, आरोग्यावर होईल उलटा परिणाम

विक्रेत्यांकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ती अजहर खान याने खरेदी केली.

विक्रेत्यांकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ती अजहर खान याने खरेदी केली.

केळी खाण्याचे जसे फायदे आहेत तसे विशिष्ट परिस्थितीत त्याचे दुष्परिणामही आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : केळं (banana) हे असं फळ आहे, जे खिशाला परवडणारं आणि भरपूर पोषक असं आहे.  शरीराला पुरेशी ऊर्जा देण्याचं काम केळं करतं. आजारी माणसांसाठीही आपण केळी घेऊन जातो. पण केळं कितीही चांगलं असेल तरी काही विशिष्ट लोकांनी केळं खाणं टाळायला हवं. अशा लोकांनी केळी खाल्ली तर त्यांना त्याच्या उलट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, रिबोफ्लेविन आणि बी 6 सारखी सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही सर्व पोषक तत्वे शरीराला निरोगी ठेवतात आणि शरीर योग्यरित्या कार्य करते. पण जर तुम्हाला श्वसनाचे कोणतेही आजार, खोकला किंवा सर्दी असेल तर थंड वातावरणात रात्री केळं खाणं टाळावं. कारण, केळं श्लेष्मा किंवा कफ असताना खाल्ल्यावर त्रास अधिक वाढू शकतो.

जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर तुम्ही केळी खाऊ नयेत किंवा ती मर्यादित प्रमाणातच (Side effects of eating banana) खावीत. सायनसला वैद्यकीय भाषेत सायनुसायटिस म्हणतात. या आजारात रुग्णाच्या नाकातील हाड वाढते, त्यामुळे नेहमी सर्दीचा त्रास होत राहतो. अशा लोकांनी थंड गोष्टी खाण्याचे टाळले तर अनेक वेळा हा आजार आपोआप कमी होऊ शकतो. पण, ज्यांना हा त्रास बराच काळ असतो त्यांना नाकाचे ऑपरेशन करावे लागते.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

ज्या लोकांना अशी कोणतीही आरोग्य समस्या नाही, त्यांनी या ऋतूत केळी खाणे अजिबात वर्ज्य करू नये. तज्ज्ञांनी केळी खाण्याचे सांगितलेले फायदेही जाणून घेऊया.

केळी खाण्याचे फायदे

1. हाडांसाठी फायदेशीर

हिवाळ्यात हाडांशी संबंधित समस्या वाढतात. केळी खाल्याने त्यातील कॅल्शियम शरीराला मिळते, ज्यामुळे हाडांची घनता टिकून राहते आणि हाडे मजबूत होतात.

2. वजन नियंत्रित राहते

केळीमुळे वजन नियंत्रणात राहते. कारण त्यात विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. विद्रव्य फायबरमध्ये पचन मंदावण्याची वृत्ती असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.

हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

3. हृदयासाठी फायदेशीर

एका अभ्यासानुसार, फायबरयुक्त पदार्थ हृदयविकार आणि कोरोनरी धमनी रोगापासून संरक्षण करतात. केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

4. चांगल्या झोपेसाठी

संध्याकाळी केळी खाणे ही चांगली सवय आहे. पोटॅशियम समृद्ध केळी दिवसभराच्या मेहनतीनंतर स्नायूंना आराम देण्यास मदत करते. संध्याकाळी उशिरा एक-दोन केळी खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि झोप चांगली लागते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Fruit, Health, Health Tips, Lifestyle