नवी दिल्ली, 08 डिसेंबर : आवळा (Amla) हे एक समृद्ध सुपरफूड आहे. हिवाळ्यात आवळा खाण्याचे अनेक फायदे (Benefits of amla) आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत आहे. हिवाळ्यात आवळा मुबलक प्रमाणात आढळतो. त्यामुळे हिवाळ्यात आवळ्याची कमतरता भासत नाही. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. याशिवाय हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्याद्वारे बनवून अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. आवळा अनेक औषधी गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचे दुष्परिणामही (Side effect of Amla) आहेत.
हिवाळ्यात लोक आवर्जून आवळा खातात पण काही विशिष्ट लोकांनी आवळा खाणं टाळायलाच हवं. कारणं त्यांना खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.
अतिआम्लता
TOI च्या वृत्तानुसार, अनेक अभ्यासात असे म्हटले आहे की, छातीत जळजळ होत असेल आवळ्याचा फायदा होतो. पण हायपर अॅसिडिटी असलेल्या रुग्णाला आवळा हानीकारक ठरू शकतो. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने पोटदुखी आणि अॅसिडिटी होऊ शकते.
रक्ताशी संबंधित समस्या
रक्ताशी संबंधित कोणताही आजार असल्यास, जखमा असल्यास किंवा त्वचेवर कोठेतरी कापले असल्यास आवळ्याचे सेवन करू नये. कारण आवळ्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असतात, म्हणजेच ते रक्त पातळ करते.
शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया झाली असेल तर आवळ्याचे सेवन करू नये. कारण जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दोन आठवडे आवळा न खाण्याचा सल्ला दिला जातो.
रक्तातील साखर
आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त असल्याचे काही अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे ज्यांच्या रक्तातील साखर कमी आहे त्यांनी आवळा खाऊ नये, कारण यामुळे साखरेची पातळी आणखी कमी होऊ शकते.
हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल
गरोदरपणा
गरोदरपणातही आवळा न खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याच्या अतिसेवनामुळे पोटदुखी, अतिसार आणि निर्जलीकरण होऊ शकते. म्हणूनच गरोदर आणि स्तनदा मातांना आवळा खाण्यास मनाई आहे. आवळा खायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips