मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Side effect of cabbage: या लोकांना कोबी खाणे ठरेल त्रासदायक; यादीत तुम्हीही नाही ना?

Side effect of cabbage: या लोकांना कोबी खाणे ठरेल त्रासदायक; यादीत तुम्हीही नाही ना?

Side effect of cabbage: कोबीमध्ये सर्वाधिक फायबर आढळतात, ज्याचा पोटासाठी फायदा होतो. कोबी पचनसंस्थेला चालना देते. याशिवाय अनेक चांगले गुणधर्म असूनही काही लोकांनी कोबीचे सेवन करू नये, त्याविषयी (Side effect of cabbage) जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : कोबी खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोबीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होत नाहीत, ज्यामुळे पेशींमध्ये सूज येत नाही. पेशींमध्ये सूज आल्यामुळे अनेक रोग विकसित होऊ शकतात. याशिवाय व्हिटॅमिन ए, बी, सी आणि पोटॅशियम देखील कोबीमध्ये आढळतात. कोबी हि हिवाळ्यातील एक चांगली भाजी आहे. हंगामी भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कोबीमध्ये सर्वाधिक फायबर आढळतात, ज्याचा पोटासाठी फायदा होतो. कोबी पचनसंस्थेला चालना देते. यामुळे हंगामी फ्लूपासून देखील संरक्षण मिळते. त्याशिवाय कोबीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि मूड देखील चांगला होतो. इतके गुणधर्म असूनही काही लोकांनी कोबीचे सेवन करू नये, त्याविषयी (Side effect of cabbage) जाणून घेऊया.

कोणत्या लोकांनी कोबी खाऊ नये

अ‌ॅलर्जी असलेले लोक

वेबएमडीच्या बातमीनुसार, ज्या लोकांना कोबीची अ‌ॅलर्जी आहे त्यांनी कोबीचे सेवन करू नये. सहसा काही लोकांना कोबीची अ‌ॅलर्जी असते. अशा स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोबीचे सेवन करू नका.

मधुमेहामध्ये

कोबीमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला मधुमेह असेल तर कोबी खाल्ल्यानंतर शुगर टेस्ट करून घ्या. जर साखरेची पातळी सामान्य नित्यक्रमाच्या तुलनेत चढ-उतार होत असेल तर कोबीचे सेवन करू नका.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

थायरॉईडमध्ये

हायपोथायरॉईडीझम असलेल्या व्यक्तीला कोबी जास्त त्रास देऊ शकते. त्यामुळे तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर तुम्ही कोबीचे सेवन करू नये.

हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

शस्त्रक्रियेमध्ये

जर तुमच्यावर कोणत्याही कारणाने शस्त्रक्रिया झाली असेल तर तुम्ही कोबी खाऊ नये. त्याचा परिणाम ग्लुकोजच्या पातळीवर होऊ शकतो. म्हणून, शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांपर्यंत कोबीचे सेवन न करणे चांगले.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips