Home /News /lifestyle /

Boost your energy : कामात वारंवार थकवा आणि आळस येतोय का? या पद्धतीनं व्हा फ्रेश आणि ताजंतवानं

Boost your energy : कामात वारंवार थकवा आणि आळस येतोय का? या पद्धतीनं व्हा फ्रेश आणि ताजंतवानं

Tips To Boost your energy: धकाधकीच्या जीवनशैलीमुळं आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळं अनेकजणांना कामात वारंवार थकवा आणि सुस्ती येते.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : धकाधकीच्या जीवनशैलीमुळं आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळं अनेकजणांना कामात वारंवार थकवा आणि सुस्ती येते. दिवसभराच्या व्यग्रतेमुळं लोकांना फक्त रात्रीच कशीबशी विश्रांती घ्यायला वेळ मिळते. या सगळ्या प्रकाराला आपली जीवनशैली कारणीभूत आहे हे उघड आहे. जर तुम्हालाही सतत थकवा आणि आळस येण्याची समस्या असेल तर त्यातून फ्रेश आणि ताजतवाणं होण्याचे काही उपाय (Tips To Boost your energy) आपण पाहुयात. योग्य आहार आपण जे खातो त्याचा आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. ताजे अन्न, फळं आणि भाज्या यांचा समावेश असलेला योग्य आहार घेणं गरजेचं आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोजच्या आहारात एका तरी हंगामी फळाचा समावेश करा. दररोज आपल्या आहारात अपरिष्कृत कार्ब आणि समृद्ध प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करा, त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय उच्च फायबर असलेल्या गोष्टीही शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात. दररोज व्यायाम करा तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी दररोज थोडा वेळ काढा आणि व्यायाम करा. मग तो योग असो किंवा कोणतेही व्यायाम प्रकार. व्यायाम केल्याने एंडोर्फिनची पातळी वाढते आणि ते तुमची ऊर्जा पातळी वाढवण्याचे काम करतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला चांगली झोपही लागते. हायड्रेशनची काळजी घ्या शरीर तंदुरूस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी हायड्रेशनचा मोठा वाटा आहे. दिवसातून किमान 3 लिटर पाणी पिण्याची खात्री करा. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा डिहायड्रेट होत असेल तर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. याशिवाय तुमच्या झोपेवरही याचा परिणाम होतो. पाण्यासोबत तुम्ही नारळ पाणी, लिंबूपाणी आणि फळांचा रस देखील तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. हे वाचा - OTT वर मनोरंजनाची मेजवानी! ‘स्पेशल ओप्स 1.5’ ते ‘रेड नोटिस’ या आठवड्यात रिलीज होणार धमाकेदार सीरीज कॅफिनचे प्रमाण कमी करा काम करताना एक कप कॉफी आणि चहा तुम्हाला अ‌ॅनर्जी देतो. पण ही ऊर्जा थोड्या काळासाठी सुस्ती देखील देऊ शकते. जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिण्याचा झोपेवर परिणाम होतो. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर चहा किंवा कॉफी अजिबात घेऊ नका. हे वाचा - ST Employees Strike: विश्रांतीगृहाला टाळं ठोकत कर्मचाऱ्यांना काढलं बाहेर, आगाराबाहेर आंदोलन सुरू; पाहा VIDEO पूर्ण झोप आवश्यक आहे दिवसा पूर्णपणे सक्रिय राहण्यासाठी, रात्री योग्यरित्या झोपणे खूप महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी काही ध्यान-धारणा अवश्य कराव्यात. याशिवाय काही हलके स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा, जे तुमचे शरीर आणि मन दोन्हीला आराम देण्यास मदत करतील. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Mental health

    पुढील बातम्या