मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हालाही घोरण्याची समस्या असेल तर काळजी घ्या; Heart Attack चा इशारा असू शकतो

तुम्हालाही घोरण्याची समस्या असेल तर काळजी घ्या; Heart Attack चा इशारा असू शकतो

Problem Of Snoring May Have A Heart Attack : घोरण्याच्या समस्येला आपण अनेकदा विनोद म्हणून घेतो. परंतु, हा तुमच्‍या हृदयाच्या समस्येचा इशारा असू शकतो. गुडसोम्नियाच्या मते, हृदयविकाराचा झटका आणि घोरणे यांचा जवळचा संबंध आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : सहसा जेव्हा आपण एखाद्याचे घोरणे ऐकतो तेव्हा आपण नकळत हसतो. मात्र, आपण झोपलो असताना शेजारून येणारा हा आवाज त्रासदायक ठरतो. घोरण्याच्या समस्येला आपण अनेकदा विनोद म्हणून घेतो. परंतु, हा तुमच्‍या हृदयाच्या समस्येचा इशारा असू शकतो. गुडसोम्नियाच्या मते, हृदयविकाराचा झटका आणि घोरणे यांचा जवळचा संबंध आहे. घोरण्यामुळं हृदयविकारासोबतच, कार्डिएक डिसऑर्डर, ओबेसिटी, डाइबिटीज, प्रीस्‍ट्रॉक धोका असू शकतो. त्यामुळं जर तुमचे कोणी कुटुंबीय किंवा मित्र या समस्येशी झुंजत असतील, तर सावध (Problem Of Snoring May Have A Heart Attack) राहण्याची गरज आहे.

धोकादायक का आहे

जेव्हा हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा रक्त प्रवाह वाढवण्यासाठी आणि अधिक ऑक्सिजन मिळवण्यासाठी ते तुमच्या रक्तवाहिन्या अधिक अरुंद बनतात. परिणामी, रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो. दबावातील अशा चढउतारांमुळे तीव्र उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

घोरण्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो का?

घोरणं हे हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या इतर गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. याचे कारण शरीरातील रक्त आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. घोरण्याचा आवाज हा हृदयविकाराचा झटका किंवा इतर आरोग्य धोक्यांसाठी अलार्म सिग्नल असू शकतो.

हे वाचा - राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि बस एकमेकांना धडकून घेतला पेट, पाच जणांचा होरपळून मृत्यू

हे कसे कार्य करते

जेव्हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शिरा अरुंद होऊ लागतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला घोरण्याची समस्या असेल तर सावध राहा आणि रात्रीच्या वेळी तुमच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीवर लक्ष ठेवा.

हे वाचा - Nykaa IPO मुळे गुतंवणूकदार मालामाल; जबरदस्त लिस्टिंगसह कंपनीची मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या पार

डॉक्टरांना कधी भेटावे?

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला रात्री चांगली झोप येत नाही आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून नियमित तपासणी करून घ्यावी.

First published:

Tags: Health, Health Tips