Home /News /lifestyle /

कामावर परफेक्ट झोप काढण्याचे वातावरण कंपन्याच तयार करतायत; पॉवर नॅपचे समजलेत फायदे

कामावर परफेक्ट झोप काढण्याचे वातावरण कंपन्याच तयार करतायत; पॉवर नॅपचे समजलेत फायदे

स्लीप फाउंडेशनच्या मते, पॉवर नॅप 30 मिनिटांपेक्षा जास्त मोठी नसावी. कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे शरीर गाढ झोपेत जाते. ज्यामुळे जागे झाल्यावर तुम्हाला सुस्त वाटू शकतं.

    नवी दिल्ली, 07 मे : सकाळपासून मन लावून पूर्णक्षमतेने काम केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेणं कोणाला आवडणार नाही. सकाळी उठल्यापासून कित्येक तास काम केल्यानंतर 20 मिनिटांचीही छोटीशी झोप (पॉवर नॅप) घेतली, तर उठल्यानंतर शरीराला आश्चर्यकारक गती मिळते. जणू मन आणि शरीर पुन्हा चार्ज झाले आहे. यासारख्या छोट्या डुलकीचे मनाला बरे वाटण्याव्यतिरिक्त अनेक (Power Nap Benefits) फायदे आहेत. सध्या पॉवर नॅपचा (कामादरम्यान मध्ये छोटीशी झोप घेणे) उल्लेख यासाठी केला जात आहे, कारण भारतातील वेकफिट (wake fit) कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात 'राईट टू नॅप' सुरू केलं आहे. वेकफिटने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी 2 ते 2:30 पर्यंत अधिकृत झोपेची वेळ (Official nap time) असेल. येत्या काही दिवसात कंपनी ऑफिसमध्येच आरामदायी झोपेसाठी शांत खोल्यांची व्यवस्था करणार आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना 'परफेक्ट झोप काढण्याचे वातावरण' मिळू शकेल. कंपनी पॉवर नॅपविषयी अधिक तयारी करत आहे. तर पॉवर नॅपचे फायदे काय आहेत, हे आपण जाणून घेऊया. पॉवर नॅपचे हे जबरदस्त फायदे - थोडी डुलकी घेतल्याने शरीर आणि मनाला आराम वाटतो. थोडी डुलकी घेतल्यानंतर, कामात पुढील 6 तास सक्रिय आणि उत्साही वाटेल. हे वाचा - दुसऱ्यांच्या या 6 गोष्टी कधी चुकूनही वापरू नका, विचित्र त्रास वाढू लागतात पॉवर नॅप घेतल्याने मूड चांगला राहतो, एकाग्र राहून काम करण्यास मदत होते. अमेरिकन स्लीप असोसिएशनच्या मते, पॉवर नॅप प्रौढांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. पॉवर नॅप घेतल्याने हृदय निरोगी राहते, तणाव कमी होतो तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. अशी डुलकी फक्त 20-30 मिनिटांसाठी असते. जास्त वेळची झोप नव्हे. स्लीप फाउंडेशनच्या मते, पॉवर नॅप 30 मिनिटांपेक्षा जास्त मोठी नसावी. कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे शरीर गाढ झोपेत जाते. ज्यामुळे जागे झाल्यावर तुम्हाला सुस्त वाटू शकतं. हे वाचा - कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs - पॉवर नॅप घेण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. - पॉवर डुलकी जास्त मोठी नसावी, म्हणून अलार्म लावून झोपा. - पॉवर नॅप फार वेळ लागणार नाही यासाठी झोपताना शांत जागा निवडा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या