मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळ्यात फक्त एक डाळिंब खाण्याचे आहेत भरपूर फायदे; वजनासह कोलेस्ट्रॉलही होईल कमी

हिवाळ्यात फक्त एक डाळिंब खाण्याचे आहेत भरपूर फायदे; वजनासह कोलेस्ट्रॉलही होईल कमी

डाळिंबापासून लिप बाम बनवा -
डाळिंब हे ओठांसाठी उत्तम लिपबाम ठरू शकते. बनवण्यासाठी प्रथम 1 कप डाळिंबाच्या बियांचा रस काढा. आता त्यात अर्धा चमचा कोमट तूप टाका, नंतर 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळा. पेस्ट घट्ट झाल्यावर पुन्हा 2 चमचे तूप घालून 1 मिनिट नीट ढवळा. आता फ्रीजमध्ये ठेवा आणि हा लिप बाम रोज ओठांवर लावा.

डाळिंबापासून लिप बाम बनवा - डाळिंब हे ओठांसाठी उत्तम लिपबाम ठरू शकते. बनवण्यासाठी प्रथम 1 कप डाळिंबाच्या बियांचा रस काढा. आता त्यात अर्धा चमचा कोमट तूप टाका, नंतर 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळा. पेस्ट घट्ट झाल्यावर पुन्हा 2 चमचे तूप घालून 1 मिनिट नीट ढवळा. आता फ्रीजमध्ये ठेवा आणि हा लिप बाम रोज ओठांवर लावा.

Health benefits of Pomegranate : डाळिंब शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवते. हिवाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डाळिंबात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई देखील असते जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : डाळिंब हे आरोग्यासाठी सर्वोत्तम फळ मानलं जातं. डाळिंब दिसायला जेवढं सुंदर आहे, तेवढंच ते खायलाही स्वादिष्ट आहे. इतर फळांच्या तुलनेत डाळिंबात सर्वाधिक पोषक तत्वे असतात. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, एका डाळिंबात 7 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम प्रोटीन, 30 टक्के व्हिटॅमिन सी, 16 टक्के फोलेट, 12 टक्के पोटॅशियम असते. एक कप डाळिंबाच्या बियांमधून 24 ग्रॅम साखर आणि 144 कॅलरी ऊर्जा मिळते. डाळिंबात आढळणाऱ्या Punicalagins आणि Punicic Acid या दोन घटकांमुळे ते बहुमोल फळ बनतं. प्युनिसेलगिन्समध्ये अँटिऑक्सिडंट आहेत तर प्युनिकिक हे फॅटी अ‌ॅसिड आहे. याशिवाय डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्यात मधुमेह, कर्करोग, अल्झायमर, लठ्ठपणा यांसारख्या आजारांशी लढण्याची क्षमता असते. डाळिंब शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवते. हिवाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डाळिंबात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई देखील असते जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. डाळिंब सांधेदुखीपासून बचाव करते, तसेच पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. डाळिंबात वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील असतात. याशिवाय डाळिंबाचे इतर (Health benefits of Pomegranate) फायदे जाणून घेऊया.

रक्तदाब संतुलित राहतो

एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाचा रस घेतल्यानं उच्च रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो. दुसऱ्या एका संशोधनात असंही आढळून आलं आहे की डाळिंबाचे सेवन रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ देत नाहीत.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

डाळिंबामुळे स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. एका संशोधनात असं आढळून आलंय की, जेव्हा रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर 2 ग्रॅम डाळिंबाचा अर्क दिला जातो, त्यावेळी स्मरणशक्तीत सुधारणा होते. उंदरांवर केलेल्या संशोधनात असंही आढळून आलं आहे की डाळिंबाचे नियमित सेवन अल्झायमर रोग रोखण्यासाठी प्रभावी आहे.

डाळिंब वजन नियंत्रणात ठेवते

डाळिंब शरीरातील चरबी नियंत्रित करते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. डाळिंब हे पोषक तत्वांनी समृद्ध असते पण त्यात फारच कमी कॅलरीज आढळतात, ज्यामुळे खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहते. जर तुम्हाला वजन वेगात नियंत्रित करायचे असेल तर दिवसभरात डाळिंब खा किंवा त्याचा रस प्या.

हे वाचा - हा असू शकतो खराखुरा ‘चाँद का टुकड़ा’! पृथ्वीच्या अगदी जवळ अनेक वर्षांपासून आहे हा रहस्यमय लघुग्रह

मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते

डाळिंबात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतात. फ्री रॅडिकल्स आपल्याला अकाली वृद्ध बनवतात. तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा. हे अँटी-एजिंगचा एक उत्तम स्रोत आहे.

तोंडाचे आरोग्य सुधारते

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध असलेले डाळिंब तोंडात प्लाक तयार होण्यास प्रतिबंध करते. डाळिंबाचा रस हिरड्यांना आलेली सूज आणि पीरियडॉन्टायटीसपासून आराम देतो.

हे वाचा - PM मोदींनी लाँच केल्या RBI च्या दोन खास योजना, सामान्यांना थेट होणार फायदा; वाचा सविस्तर

ऑक्सिजन पातळी वाढवते

डाळिंब रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करते. डाळिंबात असलेले अँटी-ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सशी लढते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. डाळिंब रक्ताभिसरण सुरळीत ठेवते, त्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips