मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health News : प्लास्टिकमुळे गंभीर हृदयविकार होऊ शकतात, नवीन संशोधनातील माहिती

Health News : प्लास्टिकमुळे गंभीर हृदयविकार होऊ शकतात, नवीन संशोधनातील माहिती

Plastic and heart disease: प्लॅस्टीकमधील फॅथलेट नावाचा घटक रक्तातील प्लाझ्मा कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतो, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. प्लास्टिक अधिक मजबूत करण्यासाठी Phthalate रसायनाचा वापर केला जातो.

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे आत्तापर्यंत अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. आता एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, प्लास्टिकमुळे हृदयाचे मोठे नुकसान होते. प्लॅस्टीकमधील फॅथलेट नावाचा घटक रक्तातील प्लाझ्मा कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतो, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. प्लास्टिक अधिक मजबूत करण्यासाठी Phthalate रसायनांचा वापर केला जातो. हा एक प्रकारचा विषारी घटक (Plastic and heart disease) आहे.

DCHP रसायने जबाबदार

एका अमेरिकन न्यूज वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पहिल्यांदाच प्लास्टिकमुळे हृदयविकाराचे कारण शोधण्यात आले आहे. या संशोधनाचे प्रमुख लेखक, कॅलिफोर्निया विद्यापीठातील चांगचेंग झोऊ (Changcheng Zhou) यांनी सांगितले की, संशोधनात डायसाइक्लोहेक्साइल फॅथलेट किंवा डीसीएचपी (dicyclohexyl phthalate or DCHP) नावाचे हानिकारक रसायन आढळले, जे प्रेग्नेन एक्स रिसेप्टर किंवा पीएक्सआरशी (pregnane X receptor or PXR) कनेक्टेड होते. DCHP आतड्यात प्रवेश करून PXR ला उत्तेजित करते, ज्यामुळे स्थिती खराब होते. PXR मुळे विशेष प्रोटीन बनते जे कोलेस्टेरॉल शोषून घेते. DCHP मुळे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होते, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. DCHP, एक प्रकारे, कोलेस्टेरॉल शोषून घेणारा विशिष्ट सिग्नल ब्लॉक करतो.

हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल

सतर्क राहणे गरजेचे

डीसीएचपीबद्दल पर्यावरण संघटना सतत चिंता व्यक्त करत आहेत. झोऊ म्हणाले की, DCHP बद्दल अजून जास्त अभ्यास झालेले नाहीत, पण त्याचे हानिकारक परिणाम खूप जास्त आहेत. ते म्हणाले की, आमच्या माहितीनुसार, प्रथमच हृदयावर DCHP च्या घातक परिणामाबाबत अभ्यास करण्यात आला आहे. DCHP चा हृदयावर खूप वाईट परिणाम होतो हे आम्हाला उंदरांवरील संशोधनातून आढळून आले आहे. उंदरांमध्ये यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार झाले. त्याचा मानवावर होणाऱ्या परिणामाच्या संदर्भात आतापर्यंत अभ्यास झालेला नसला तरी आपल्याला प्लॅस्टिक वापर टाळणे गरजेचे आहे.

First published:

Tags: Health, Plastic