नवी दिल्ली, 23 जानेवारी : आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या रेडीमेड टूथपेस्ट आणि माउथवॉश
(Mouthwash) उपलब्ध आहेत. ज्याचा वापर बहुतेक लोक तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करतात
(Oral bad breath). सकाळी ब्रश केल्यावर काही वेळानंतर अनेकांच्या तोंडातून पुन्हा दुर्गंधी येऊ लागते आणि दात-दाढा किडलेल्या असतील तर ही समस्या जास्त जाणवते. त्यामुळे या महागड्या आणि केमिकलयुक्त उत्पादनांना अलविदा करून तुम्ही घरच्या घरी सहज माऊथवॉश
(Oral Hygiene Tips) बनवू शकता.
आज आपण काही नैसर्गिक माउथवॉश
(Homemade Mouthwash) बनवण्याच्या पद्धतींबद्दल जाणून घेऊयात. याच्या मदतीने तुम्ही दातांची ही समस्या चुटकीसरशी सोडवू शकता. या घरगुती माउथवॉशचा परिणाम देखील खूप चांगला होईल आणि साइड इफेक्ट्स देखील दिसणार नाहीत.
मीठ आणि बेकिंग सोड्याने माउथवॉश बनवा
बरेच लोक घसा साफ करण्यासाठी आणि तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळवण्यासाठी मिठाचा उपयोग करतात. तर बेकिंग सोडा तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मीठ आणि बेकिंग सोडा माउथवॉश बनवण्यासाठी उपयोगी आहे. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून मीठ घ्या. आता दोन्ही 1 कप कोमट पाण्यात मिसळा आणि ब्रश केल्यानंतर, 30 सेकंदांसाठी दिवसातून दोनदा गुळण्या करा. मात्र, लक्षात ठेवा की जास्त मीठ हिरड्यांमध्ये सूज आणू शकते, म्हणून मर्यादित प्रमाणात मीठ वापरा.
हे वाचा - Corona Vaccine: कोरोना झाल्यानंतर लसीकरण आणि प्रीकॉशन डोसचा कालावधी बदलला, इतक्या महिन्याचे अंतर
लिंबाचा रस आणि पाण्याने माउथवॉश बनवा
लिंबू व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिडचा चांगला स्रोत मानला जातो. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया मरतात तसेच दात चमकदार बनतात. हा माउथवॉश बनवण्यासाठी 1 कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि दिवसातून दोनदा 30 सेकंद गुळण्या करा. यामुळे तोंडाची दुर्गंधी लगेच निघून जाईल.
हे वाचा - OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल
लवंग आणि दालचिनी माउथवॉश
लवंग दातातील किडीसाठीही फायदेशीर आहे. तर लवंग आणि दालचिनीचे मिश्रण श्वासाची दुर्गंधी घालवण्यासाठी उपयोगी आहे. यासाठी अर्धा कप पाणी घ्या. त्यात 7-8 थेंब दालचिनीचे तेल आणि 7-8 थेंब लवंग तेल घाला. हे मिश्रण चांगले मिसळा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ब्रश केल्यानंतर या मिश्रणाने 3-4 मिनिटे गुळण्या करा. असे केल्याने श्वासाची दुर्गंधी नक्कीच कमी होईल.
(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.