मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आरोग्यच नव्हे तर परिसंस्थेवरही ध्वनी प्रदूषणाचा होत आहे असा घातक परिणाम - संशोधन

आरोग्यच नव्हे तर परिसंस्थेवरही ध्वनी प्रदूषणाचा होत आहे असा घातक परिणाम - संशोधन

जास्त आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या चयापचयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो, अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो.

जास्त आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या चयापचयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो, अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो.

जास्त आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या चयापचयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो, अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो.

    नवी दिल्ली, 05 मे : सातत्याने वाढणारे ध्वनी प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सतत वाढत जाणारी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे, यंत्रसामग्री उद्योग आणि खूप मोठ्या आवाजात संगीत ऐकणे, ध्वनीक्षेपक लावणे ही ध्वनी प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. ध्वनी प्रदूषणामुळे मानव, प्राणी आणि वनस्पतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोठ्या शहरांपासून ते अनेक देशांतील दुर्गम भागांपर्यंत लोक ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात येत आहेत. त्यामुळे परिसंस्थेवरही (Ecosystem) परिणाम होत आहे. फ्रंटलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जास्त आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या चयापचयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो, अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो. एका अभ्यासानुसार, युरोपमध्ये दरवर्षी 48,000 लोक मोठ्या आणि सततच्या आवाजामुळे हृदयविकाराने बाधित होतात आणि सुमारे 12,000 लोकांचा अकाली मृत्यू होत आहे. जर्मन फेडरल एन्व्हायर्नमेंटल एजन्सी (UBA) चे ध्वनी विशेषज्ञ (noise specialist) थॉमस माईक म्हणतात, “जर फ्लॅट किंवा घर मुख्य रस्त्यावर असेल तर भाडे कमी असावे लागते. याचा अर्थ असा की ज्यांचे उत्पन्न कमी आहे ते गोंगाटाच्या ठिकाणी राहण्याची शक्यता जास्त असते.” म्हणजेच सर्वसामान्य लोकांना गोंगाटाचा जास्त त्रास सहन करावा लागतो. हे वाचा - मुलांना शाळेत जाताना डब्यात द्या हे पदार्थ; हेल्दी पण आहेत आणि आवडीनं खातील आवाजाचा परिणाम प्राण्यांवरही होतो - ध्वनी प्रदूषणाचा फटका प्राण्यांनाही बसत आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, आवाजामुळे सर्व प्राणी प्रजातींचे वर्तन बदलत आहे. पक्षी त्यांच्या सोबत्यांशी बोलण्यासाठी मोठा आवाज करत आहेत. युरोप, जपान किंवा ब्रिटनमधील शहरांमध्ये राहणारे टिट पक्षी जंगलात राहणाऱ्या टिट्सपेक्षा मोठ्याने गातात. रस्त्यालगतचे किडे, तृणभट्टी आणि बेडूक यांच्या आवाजातही बदल दिसून आला आहे. हे वाचा - 100 वर्षांपेक्षा जास्त जगणारे कोणत्या चक्कीचं पीठ खातात? रहस्य उलगडलं मोठ्या शहरांमध्ये आवाज मानकांपेक्षा जास्त - लंडनपासून ढाक्यापर्यंत आणि बार्सिलोनापासून बर्लिनपर्यंत जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अधिक गोंगाट होत आहे. न्यूयॉर्कमधील सार्वजनिक वाहतूक वापरणारे 90 टक्के लोक सामान्य मर्यादेपेक्षा लक्षणीय आवाजाचा अनुभव घेत आहेत. यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमता नष्ट होऊ शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Pollution

    पुढील बातम्या