Home /News /lifestyle /

मोबाईल, कॉम्प्युटरसमोर झुकत आपण नकळत 27 किलो वजन पाठीच्या कण्यावर टाकतो

मोबाईल, कॉम्प्युटरसमोर झुकत आपण नकळत 27 किलो वजन पाठीच्या कण्यावर टाकतो

मोबाईल-कॉम्प्युटरसमोर जणू नतमस्तक होऊन आपण दिवसभर काम करतो. हे आपल्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. सतत जास्त वेळ बसणे आणि मान झुकवून ठेवल्याने मणक्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

    नवी दिल्ली, 27 मे : कोरोनाच्या काळात मोबाईलचा वापर आणि कार्यालयात संगणकावर कामाचा वेळ वाढला आहे. मोबाईल-कॉम्प्युटरसमोर जणू नतमस्तक होऊन आपण दिवसभर काम करतो. हे आपल्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. सतत जास्त वेळ बसणे आणि मान झुकवून ठेवल्याने मणक्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन कायरोप्रॅक्टर्स असोसिएशनने (Australian Chiropractors Association) नवीन संशोधनात दावा केला आहे की, आपण या उपकरणांचा अशा प्रकारे सतत वापर करत राहिलो तर मानेवर आणि पाठीचे कुबड बाहेर येऊ शकते. शास्त्रज्ञांनी याला 'टेक-नेक' (Tech-Neck) असे नाव दिले आहे. या स्थितीत मणक्याला झुकावे लागते. ऑस्ट्रेलियाच्या स्पाइन स्पेशलिस्टच्या मते, जेव्हा आपण मान 60 अंश पुढे वाकवतो तेव्हा आपण 27 किलोग्रॅम वजन मणक्यावर आणतो. सिडनीचे ट्रुडी यिप (Trudi Yip) सांगतात की, त्यांनी दिवसाचे 12 तास काम केल्यावर मानेवर कुबड आल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती, डोकेदुखीही सुरू झाली होती. आठवड्यातून 70 तास काम केल्यानंतर, त्यांच्यावर बेड पकडण्याची वेळ आली. ट्रुडी यांनी मणक्याच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने 8 आठवडे स्पाइन-नेकचे व्यायाम केले. ऑफिसमध्ये बसण्याची पद्धत सुधारली, स्ट्रेच केला, मग परत जुना व्यवस्थित लूक मिळाला. अभ्यासात काय झाले? ऑस्ट्रेलियातील प्रौढांवरील अभ्यासानुसार, 42% प्रौढांना मानदुखीचा त्रास होता. तितक्याच संख्येने लोक मान ताठ होण्याच्या समस्येशी झगडत होते. 36% लोकांना डोकेदुखी आणि 25% मायग्रेनने त्रासलेले होते. जवळजवळ एक तृतीयांश ऑस्ट्रेलियन प्रौढांनी सांगितले की ते तासाला 5-30 वेळा मोबाईल फोन वापरतात. 10 पैकी एक कबूल करतो की, ते 40 वेळाही असे करतात. तज्ज्ञांनी त्यांना दर 30-60 मिनिटांनी उठून फिरण्यास सांगितले. मोबाईल पकडण्याची पद्धत बदला - 20/20 ब्रेक घ्या फोन किंवा संगणक वापरत असताना दर 20 मिनिटांनी 20 सेकंद विश्रांती घ्या. उभे राहा, चाला आणि स्ट्रेच करा. मोबाईल डोळ्याच्या लेवलवर आणा - फोनची स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर आणा, जेणेकरून डोके पुढे झुकणार नाही किंवा उंचावणार नाही. पाठीचा कणा सरळ ठेवा जेणेकरून कान आणि खांदे एका ओळीत असतील. हे वाचा - जूनमध्ये या 5 ग्रहांच्या स्थितीत होणार मोठे बदल; या राशीचे लोक होणार मालामाल झोपेची पद्धत सुधारा - पोटावर झोपल्यानंतर मान दुखत असेल तर पाठीवर किंवा एका कुशीवर झोपून बघा. पोटावर झोपू नये म्हणून तुम्ही उशा घेऊनही झोपू शकता. हे वाचा - आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही मशरूमचा असा होतो उपयोग; जाणून घ्या सर्व फायदे तीन टप्प्यांमध्ये पोश्चर बदला - कॅनेडियन ऑस्टियोपॅथ ब्रँडन टॅलबोट यांच्या मते, मुद्रा (पोश्चर) सुधारण्यासाठी मानेचे व्यायाम केले जाऊ शकतात. दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडून डोक्याच्या मागे ठेवा. भिंतीला तोंड आणि कोपर भिंतीवर ठेवत वरच्या दिशेने हलवा. यामुळे मणक्याची मुद्रा सरळ होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या