मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health News: हिवाळ्यात न्युमोनिया होण्याचा धोका अधिक, जाणून घ्या त्याची लक्षणं आणि उपाय

Health News: हिवाळ्यात न्युमोनिया होण्याचा धोका अधिक, जाणून घ्या त्याची लक्षणं आणि उपाय

Tips to prevent from pneumonia in winter: कोविडमधून बरे झाल्यानंतर लोकांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याचेही अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कोविड होऊन न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढू लागली आहे. निमोनियाचा प्रभाव हिवाळ्याच्या काळात अधिक जाणवतो

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : न्यूमोनिया हा एक गंभीर श्वसन रोग आहे, जो जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसात संसर्ग (Infection in Lungs) होतो. 2019 मध्ये, निमोनियामुळे सुमारे 2.5 दशलक्ष लोक मरण पावले. यामध्ये 6.72 लाख मुलांचा समावेश आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतर लोकांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याचेही अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कोविड होऊन न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढू लागली आहे. निमोनियाचा प्रभाव हिवाळ्याच्या काळात अधिक जाणवतो. हिवाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग वाढू (Tips to prevent from pneumonia in winter) लागतो.

निमोनिया म्हणजे काय

न्यूमोनिया हा फुफ्फुसाच्या संसर्गाचा आजार आहे. यामध्ये फुफ्फुसांना असामान्य सूज येते. अधिक गंभीर संसर्ग झाल्यास, फुफ्फुसांमध्ये पाणी भरते. सामान्यतः हे बॅक्टेरिया किंवा विषाणूच्या संसर्गामुळं होतं जे सामान्य इन्फ्लूएंझा सारखेच असते. परंतु, अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, ते कोविड व्हायरसमुळे देखील होत आहे. HTK च्या बातमीनुसार, यामुळे फुफ्फुसांचे खूप नुकसान होते.

न्यूमोनियाचे कारण काय

टीव्हीचे बॅक्टेरिया अजूनही भारतात न्यूमोनियाचे सर्वात मोठे कारण आहेत. याशिवाय विषाणू आणि बुरशी देखील न्यूमोनियाचे कारण असू शकतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास अशा व्यक्तीला न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. जर घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी फारच कमी वायुवीजन असेल तर न्यूमोनियाचा धोका असतो. आता किडनी प्रत्यारोपण आणि यकृत प्रत्यारोपणाच्या रुग्णांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.

न्यूमोनियाची लक्षणं काय

सामान्यतः न्यूमोनियाच्या रूग्णांमध्ये थंडी वाजून किंवा काहींना थंडी न वाजताही खूप जास्त ताप येतो.

व्यक्तीला खोकल्याबरोबर पिवळ्या रंगाचा श्लेष्मा येत असेल. यासोबतच खूप ताप येणे आणि दीर्घ श्वास घेताना व्यक्तीला खूप वेदना होत असतील तर न्यूमोनिया असण्याची शक्यता दाट असते.

काही रुग्णांना छातीत दुखते. कधी कधी खोकल्याबरोबर रक्तही येते.

भूक लागत नाही.

हे वाचा - मोठी बातमी: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची दहशतवादी संघटनेची धमकी!

अशी लक्षणे दिसतात तेव्हा काय करावे -

साधा न्यूमोनिया एक्स-रे किंवा सीटी स्कॅनद्वारे ओळखला जाऊ शकतो. त्यानंतर उपचाराने न्यूमोनिया बरा होतो. म्हणून, लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

न्यूमोनिया टाळण्यासाठी काय करावे

थंडीच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. त्यावेळी हवामान गरम असले तरीही काळजी घेणं गरजेचं आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कधी उष्णतेमुळे, तर कधी थंडीमुळे लोक बेफिकीर राहिल्याने न्यूमोनियाला बळी पडतात.

कोविड लसीबरोबरच बॅक्टेरियाची लसही द्यायला हवी. बॅक्टेरियाची लस लागू करून रोगाची तीव्रता कमी झाल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे.

हे वाचा - Virtual real estate plot sell: आभासी जमिनीसाठी थोडेथोडके नव्हे तर खर्च केले 1 अब्ज! आतापर्यंतचं महागडं डील

जे लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात त्यांना न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच धूम्रपान आणि मद्यपान थांबवणे फायद्याचे आहे.

मधुमेही रुग्णांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

आहारात भरपूर पोषक तत्वांचा समावेश करावा.

First published:

Tags: Health, Health Tips