• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Olive Oil : संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे ऑलिव ऑयल, जाणून घ्या सर्व फायदे

Olive Oil : संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे ऑलिव ऑयल, जाणून घ्या सर्व फायदे

Health benefits of Olive Oil:ऑलिव्ह ऑईल शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्स असल्यामुळे ते अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. ऑलिव्ह ऑइल हृदयविकाराचा धोका कमी करते आणि दृष्टीही सुधारते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : उत्तम आरोग्यासाठी आपला आहार खूप महत्त्वाचा आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. यामुळे अनेकांना त्रास होत आहे. लोकांनी निरोगी आयुष्यासाठी अलिकडे आहाराकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे आणि ते त्यांच्या आहारात अनेक गोष्टी बदलत आहेत. अनेकजण स्वयंपाकात ऑलिव्ह ऑईल वापरायला लागले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार ऑलिव्ह ऑईल शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्स असल्यामुळे ते अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. ऑलिव्ह ऑइल हृदयविकाराचा धोका कमी करते आणि दृष्टीही सुधारते. तसेच ऑलिव्ह ऑईल त्वचेच्या समस्यांमध्ये खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईलचे इतर कोणते (Health benefits of Olive Oil) फायदे आहेत. ऑलिव्ह ऑइलचे फायदे अ‌ॅसिडिटी होत नाही - ऑलिव्ह ऑइल खूप हलकं आहे. हे देसी फूड म्हणून अगदी योग्य आहे. त्याची चव देखील अतिशय नॅचरल आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये अॅसिडिटीची समस्या 0.3 टक्क्यांपेक्षा कमी असते. हे भाज्या, मांस, मासे, सॅलडसाठी योग्य तेल आहे. कोरडी त्वचा सुधारते - ऑलिव्ह ऑईल कोरडी त्वचा बरी करते. ऑलिव्ह ऑइलमुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते पेशींच्या आतील भागांना पोषक तत्त्वे पुरवते. त्यामुळे त्वचेचा बाहेरचा थर खराब होण्यापासून वाचू शकतो. हे वाचा - VIDEO : पहिल्यांदाच सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर बसला दीर; प्रताप पाहून लावाल डोक्याला हात हृदयासाठीही चांगले - ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असते. यातून चांगली चरबी मिळते, ज्यामधून चांगले कोलेस्ट्रॉल तयार होते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. ऑलिव्ह ऑइल इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रित करते. हाडे मजबूत - ऑलिव्ह ऑइल हाडांसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि के असतात जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे वाचा - Bank of Baroda देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! आजच आहे Mega e-Auction पचन सुधारते- ऑलिव्ह ऑईल पचनासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळतो. डोळ्यांसाठी फायदेशीर - डोळ्याभोवती ऑलिव्ह ऑइलने हलके मसाज करणे खूप फायदेशीर आहे. थकवा नाहीसा होतो आणि नीट झोप लागते.
  Published by:News18 Desk
  First published: