मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Constipation: लहान मुलांमध्येही बद्धकोष्ठतेची समस्या वाढतेय; जाणून घ्या त्याची कारणं आणि उपाय

Constipation: लहान मुलांमध्येही बद्धकोष्ठतेची समस्या वाढतेय; जाणून घ्या त्याची कारणं आणि उपाय

बहुतेक लोकांची पचनक्रिया बरोबर नसते, त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या नेहमीच असते, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांची पचनक्रियाही बिघडली आहे, त्यामुळे त्यांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ (Home remedies for children’s constipation) लागला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,19 नोव्हेंबर : कोरोना महामारीमुळं अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रौढांवर परिणाम झालाच आहे, त्यासोबत लहान मुलांवरही कोरोना आणि त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालाय. मुलांचा अभ्यास खोळंबला. त्यांचे बाहेर जावून मैदानी खेळ बंद झाले. एकप्रकारे त्यांचे आयुष्य मोबाईल आणि टीव्हीवरच मर्यादित झालं. यामुळं मुलांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल झाला असून त्यांची पचनसंस्थाही बिघडली आहे. यामुळेच आजकाल मुलांमध्येही बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागली आहे. बद्धकोष्ठतेची समस्या ज्येष्ठांसाठी सामान्य आहे. बहुतेक लोकांची पचनक्रिया बरोबर नसते, त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या नेहमीच असते, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांची पचनक्रियाही बिघडली आहे, त्यामुळे त्यांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ (Home remedies for children’s constipation) लागला आहे.

जंक फूड आणि बाहेरील शारीरीक हालचाली

मुलांनी हल्ली जास्त जंक फूड घेणं सुरू केलं आहे आणि त्यांची बाहेरच्या अ‌ॅक्टीविटीज खूप कमी झाल्या आहेत. यामुळेच आजकाल बहुतेक मुले बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहेत. कोरोनाच्या काळात बहुतांश मुलांचे आयुष्य घरात कोंडले गेले. मुलांना बाहेर खेळण्याची संधी क्वचितच मिळते. त्यामुळे मुलेही जाड होत आहेत आणि त्यांच्यात बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटनुसार, पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढत जाते. गंभीर परिस्थितींमध्ये, या वयापासून, मुलांमध्ये फिशर आणि मूळव्याधचे रोग देखील होऊ शकतात. म्हणूनच हे महत्वाचे आहे की, जर मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर ते गांभीर्याने घ्या आणि त्यावर त्वरित उपचार करा. काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने मुलांना बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवता येते.

हे वाचा - Vegan Tea: तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणते -

सकाळी जेव्हा मूल उठेल तेव्हा दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी. रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सकाळी मुलांना भिजवलेले मनुके खायला सांगा.

रात्री झोपताना अर्धा ग्लास दूध प्यायला द्यावे. त्यात थोडं तूप घातलं तर चांगला परिणाम येतो.

रात्री घड्याळाच्या दिशेने पोटावर हिंग लावा.

हे वाचा - Foods for Zinc : या 5 गोष्टींच्या मदतीनं भरून काढा शरीरातील झिंकची कमतरता

कच्चे अन्न त्यांना खायला देऊ नका. शिजवलेले किंवा उकडलेले अन्न वापरा.

First published:

Tags: Health Tips, School children