मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Onion with Lemon: कच्चा कांदा आणि लिंबू यासाठी खाणं आहे महत्त्वाचं; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

Onion with Lemon: कच्चा कांदा आणि लिंबू यासाठी खाणं आहे महत्त्वाचं; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

Health benefits of onion with lemon: कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. कांद्यामध्ये अॅलिसिनसारखं (allicin) सल्फर कंपाऊंड आढळतं, जे शरीरासाठी फायदेशीर आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : कांद्याशिवाय (onion) भाजीची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्या देशात कांद्याला इतकं महत्त्व आहे की, याच्याशी संबंधित उलाढाली आणि मुद्द्यांवरून सरकारेही कोसळून पडू शकतात. कांदा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा वापरला जातो. मात्र, कच्चा कांदा खाण्याची सवय फार कमी लोकांना असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. कांद्यामध्ये अॅलिसिनसारखं (allicin) सल्फर कंपाऊंड आढळतं, जे शरीरासाठी फायदेशीर आहे. कांद्याला फायबरचं पॉवर हाऊसही (Powerhouse of Fiber) म्हणतात. स्थूलपणा कमी करण्यासाठी कांदा फायदेशीर (Health benefits of onion with lemon) मानला जातो.

एचटीच्या वृत्तानुसार, कांद्यामध्ये लिंबू घालून सॅलाडप्रमाणं खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे होतात. समग्र जीवनशैलीचे शिक्षक (होलिस्टिक लाइफस्टाइल कोच) ल्यूक कौटिन्हो (Luke Coutinho) यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर कच्चा कांदा-लिंबू मिसळून खाण्याचे अनेक फायदे शेअर केले आहेत. त्यांनी लोकांना सल्ला दिलाय की, जेवण्यापूर्वी त्याचं सेवन केल्यास ते अनेक प्रकारे उपयुक्त ठरतं.

हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

कांदा आणि लिंबाचे फायदे

इंस्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर करताना कौटिन्हो म्हणाले की, जेवण्यापूर्वी कांद्यामध्ये लिंबाचा रस घालून खाणं हे उत्तम स्टार्टर आहे. कांदा पचनक्रिया वाढवतो. अभ्यासानुसार, कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन आणि फ्रुक्टोलिगोसेकराइड (inulin and fructooligosaccharides) असतात, जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करते. कांदा अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. कोशिंबीर, चटणी, चाट, भाजीची ग्रेव्ही या रूपात तो खाता येतो. कांद्यामध्ये टोमॅटो मिसळून कोशिंबीर बनवल्यास स्वाद आणखी छान लागतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं संयुग असतं, जे कांद्यासह अन्न शोषण्यास मदत करतं.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

या लोकांनी कच्चा कांदा खाऊ नये

कांदा प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे किंवा पोट फुगण्याची समस्या आहे किंवा ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome) आहे, त्यांनी कांदा खाऊ नये. यामुळं समस्या आणखी वाढू शकतात.

First published:

Tags: Health Tips, Onion