मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Black carrots : कधी खाल्लं आहे का काळं गाजर; 'या' जीवघेण्या आजारावरही आहे प्रभावी

Black carrots : कधी खाल्लं आहे का काळं गाजर; 'या' जीवघेण्या आजारावरही आहे प्रभावी

Health benefits of Black carrots : काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन (anthocyanin) रसायन आढळते, त्यामुळे त्याचा रंग काळा होतो. नारंगी गाजरांच्या तुलनेत काळ्या गाजरातून काहीअतिरिक्त फायदे मिळतात.

Health benefits of Black carrots : काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन (anthocyanin) रसायन आढळते, त्यामुळे त्याचा रंग काळा होतो. नारंगी गाजरांच्या तुलनेत काळ्या गाजरातून काहीअतिरिक्त फायदे मिळतात.

Health benefits of Black carrots : काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन (anthocyanin) रसायन आढळते, त्यामुळे त्याचा रंग काळा होतो. नारंगी गाजरांच्या तुलनेत काळ्या गाजरातून काहीअतिरिक्त फायदे मिळतात.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 डिसेंबर : साधारणपणे अनेकांना फक्त लाल किंवा केशरी गाजरांबद्दल माहिती असते. काळ्या गाजरांबद्दल (Black carrots) लोकांना फार कमी माहिती आहे. जरी काळ्या गाजरांचा उगम भारत, अफगाणिस्तान आणि तुर्कीमध्ये झाला असला तरी जगाच्या प्रत्येक भागात काळे गाजर पिकवले जाते. बीटा कॅरोटीनमुळे केशरी किंवा पिवळ्या गाजरांना लाल रंग येत असतो, परंतु काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन (anthocyanin) रसायन आढळते, त्यामुळे त्याचा रंग काळा होतो. नारंगी गाजरांच्या तुलनेत काळ्या गाजरातून काही अतिरिक्त फायदे मिळतात. काळ्या गाजरामध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची (Health benefits of Black carrots) क्षमता असते. काळ्या गाजरांची चवही केशरी गाजरांपेक्षा चांगली असते. याशिवाय त्याचा गोडवाही चांगला आहे. ते खाल्ल्यानंतर बराच वेळ तोंड चवदार राहते. काळ्या गाजरामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी सारखे पोषक घटक असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जाणून घेऊया काळ्या गाजराचे कोणते फायदे आहेत. पचनसंस्थेला चालना मिळते TOI च्या बातमीनुसार, काळ्या गाजरामध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पाचन तंत्राला चालना मिळते. याच्या सेवनाने रक्त शुद्ध होते आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. काळे गाजर बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे, छातीत जळजळ, अस्वस्थता, अतिसार यांसारखे आजार बरे करते. प्रतिकारशक्ती वाढवते काळ्या गाजराच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. काळ्या गाजरामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस दोन्ही नष्ट करण्याची क्षमता असते. काळे गाजर सर्दी आणि फ्लूपासून देखील संरक्षण करते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. यामुळे शरीराला बाह्य संसर्ग किंवा रोगापासून संरक्षण मिळते. हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर कर्करोगाचा धोका कमी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काळ्या गाजरमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. त्यात अँथोसायनिन रसायन असल्यामुळे ते दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याशिवाय यामध्ये असलेले अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. ही गाजरे शरीरात कार्सिनोजेनिक कणांच्या प्रवेशास प्रतिबंध करतात. दृष्टी वाढवते नारंगी गाजरांप्रमाणेच काळ्या गाजरामध्येही व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. यामध्ये बीटा कॅरोटीन देखील असते जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने चष्म्याचा नंबर कमी होऊन दृष्टी वाढू शकते. हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी अल्झायमरपासून देखील संरक्षण काळ्या गाजरांचे सेवन अल्झायमरपासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे काही अभ्यासातून दिसून आले आहे. यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका कमी होतो. यासाठी गाजरातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँथोसायनिन घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
First published:

Tags: Food, Fruit, Health, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या