मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Carpel Tunnel Syndrome: कार्पेल टनेल सिंड्रोम म्हणजे काय? थंडीच्या दिवसात हाथ आणि बोटांना का येतो सुन्नपणा

Carpel Tunnel Syndrome: कार्पेल टनेल सिंड्रोम म्हणजे काय? थंडीच्या दिवसात हाथ आणि बोटांना का येतो सुन्नपणा

Tips to prevent from carpel tunnel syndrome: जेव्हा एकाच प्रकारचे काम हाताने वारंवार केले जाते, तेव्हा कार्पेल टनल सिंड्रोम होऊ शकतो. जसे हाताने टायपिंगचे काम. यामध्ये मनगटाच्या मध्यभागी असलेल्या मज्जातंतूवर खूप दबाव येतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : कार्पेल टनेल सिंड्रोम ही एक न्यूरोलॉजिकल अवस्था आहे. यामध्ये हात किंवा हाताच्या बोटांमध्ये सुन्नपणा येतो. या अवस्थेत रुग्णाचा हात खूप अशक्त होतो आणि जेव्हा स्थिती गंभीर बनते तेव्हा रुग्ण त्या हाताने काहीही करू शकत नाही. हिवाळ्यात हातांना अधिक बधीरपणा येतो. यामध्ये हाताच्या किंवा हाताच्या बोटांमध्येही (Tips to prevent from carpel tunnel syndrome) खूप वेदना होतात.

कधीकधी हाताला मुंग्या येणे किंवा झिनझिन्या येण्याचा त्रास देखील होतो. काही प्रकरणांमध्ये हिवाळ्यात हातांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे हात सुन्न होऊ शकतो. मात्र, जेव्हा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर जास्त दबाव असतो किंवा तो संकुचित होतो तेव्हा कार्पेल टनेल सिंड्रोम होतो. कार्पेल टनेल सिंड्रोमचे कारण काय आहे आणि त्यापासून मुक्त कसे व्हावे ते जाणून घेऊया.

कार्पेल टनेल सिंड्रोमचे कारण

वेबएमडीच्या वृत्तानुसार, हाताला बधीरपणा का येतो? याची कारणे सहसा अनेक लोकांना माहिती नसतात. जेव्हा एकाच प्रकारचे काम हाताने वारंवार केले जाते, तेव्हा कार्पेल टनल सिंड्रोम होऊ शकतो. जसे हाताने टायपिंगचे काम. यामध्ये मनगटाच्या मध्यभागी असलेल्या मज्जातंतूवर खूप दबाव येतो. यामुळे, कार्पेल हाड आणि कार्पेल लिगामेंटमध्ये आकुंचन किंवा ताण येतो, ज्यामुळे हात आणि मनगटाच्या खाली बोटांमध्ये खूप वेदना होतात.

याशिवाय ज्यांना थायरॉईडची समस्या, लठ्ठपणा, संधिवात किंवा मधुमेह आहे त्यांनाही कार्पेल टनल सिंड्रोम होऊ शकतो. ही वेदना गर्भधारणेदरम्यान देखील होऊ शकते.

हे वाचा - अमेरिकेत कोरोना कहर, व्हेंटिलेटरही कमी पडू लागले; स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा Lockdown ची स्थिती

हात सुन्न होण्यावर उपचार काय?

कार्पेल टनल सिंड्रोमच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. परंतु, जीवनशैलीत काही बदल करून या आजारापासून सुटका मिळवता येते.

यासाठी जर तुम्ही कोणतेही काम सतत हाताने करत असाल तर त्याला काही दिवस विश्रांती द्या.

कार्पेल टनल सिंड्रोमच्या हा व्यायाम किंवा स्ट्रेचिंगद्वारे देखील नीट केला जाऊ शकतो.

हे वाचा - नगरमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढला; हाय रिस्क देशातून 86 प्रवाशी जिल्ह्यात दाखल

हाताची हालचाल मर्यादित करण्यासाठी डॉक्टर स्प्लिंट लावतात. त्यामुळे काही आठवड्यांनंतर ते बरे होऊ लागते.

दाहक-विरोधी औषध देऊनही कार्पेल टनल सिंड्रोम बरा होऊ शकतो.

काही दिवस गरम पाण्याने अंघोळ केल्यानंही फायदा होतो.

तुम्ही प्रभावित हातांची मालिश देखील करू शकता.

First published:

Tags: Health, Health Tips