नवी दिल्ली, 30 डिसेंबर : मटार किंवा हिरवा वाटाणा हा पोषक तत्वांचा खजिना आहे. सामान्यतः अन्नपदार्थांमध्ये निवडक पोषक घटक आढळतात. परंतु, वाटाणा ही अशी एक गोष्ट आहे, ज्यामध्ये जवळजवळ सर्व पोषक घटक एकत्र आढळतात. त्यात ए, बी, सी, ई, के अशी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. याशिवाय मटारमध्ये झिंक, पोटॅशियम आणि फायबरही भरपूर प्रमाणात असते. मटारमध्ये अनेक प्रकारची खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात. याचा उपयोग डोळ्यांच्या संपूर्ण संरक्षणासह कर्करोगाशी लढण्यापर्यंत विविध आजारांमध्ये होतो. जाणून घेऊया मटारचे कोणते (Health benefits of peas) फायदे आहेत.
डोळ्यांसाठी फायदेशीर
वेबएमडीच्या बातमीनुसार, मटारमध्ये कॅरोटीनॉइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन (carotenoids lutein and zeaxanthin) आढळतात. याचा डोळ्यांच्या विविध आजारांमध्ये, मोतीबिंदूमध्येही उपयोग होतो. मटारमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
रोग प्रतिकारशक्ती वाढते
हिरव्या वाटाणामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट आढळतात. ज्यामुळे आहारात घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हिरव्या वाटाणामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते.
अँटी-इंफ्लामेटरी
हिरव्या वाटाणामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि संधिवात होण्याचा धोका कमी होतो.
चयापचय सुधारते
मटार हे केवळ पाचक अन्नच नाही तर ते चयापचय आरोग्य देखील सुधारते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तसेच चांगले बॅक्टेरिया वाढतात. फायबर हा विरघळणारा पदार्थ आहे, जो लवकर पचतो. त्यामुळे बद्धकोष्ठता (constipation) होऊ देत नाही. चयापचय आरोग्यासाठी (metabolic health) फायबर अत्यंत प्रभावी मानले जाते. टाईप 2 मधुमेह आणि लठ्ठपणा देखील नियंत्रित राहतो.
हे वाचा - फक्त सुगंधाला भुलू नका; Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा अन् मगच पैसे द्या
स्मरणशक्ती सुधारण्यास
मटार रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात. तसेच शरीराला जलद ऊर्जा प्रदान करतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही ते गुणकारी आहेत. ग्लायसेमिक इंडेक्स फूडमध्ये मटारची पातळी खूप कमी असते, त्यामुळे जेवणानंतर साखरेचे प्रमाण वाढत नाही. याशिवाय मटारमध्ये अनेक गुणधर्म आढळतात. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियमसह अनेक आवश्यक खनिजे आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात. त्यामुळे मटारांचा आहारात नियमित समावेश करा.
हे वाचा - Egg and Diabetic : अंडी खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका? जाणून घ्या याबाबतचं सत्य
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle