• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Best healthy food for kids: तुमच्या मुलांना ताकदवान बनवण्यासाठी उपयोगी आहेत 'या' गोष्टी; आजारही राहतील दूर

Best healthy food for kids: तुमच्या मुलांना ताकदवान बनवण्यासाठी उपयोगी आहेत 'या' गोष्टी; आजारही राहतील दूर

मुलांचं आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून असतं, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास अनेक लाभ मिळू (Best healthy food for kids) शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : जर तुम्हाला तुमच्या मुलाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायचं असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मुलांचं आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून असतं, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास अनेक लाभ मिळू (Best healthy food for kids) शकतात. मुलाला मजबूत कसं बनवायचं? आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी दररोज जीवनसत्त्वं, खनिजं, चरबी आणि प्रथिनं संतुलित प्रमाणात सेवन केली पाहिजेत. त्यांच्या शारीरिक विकासासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या सांगण्यानुसार तुमचं मूल अशक्त असेल तर तुम्ही त्याच्या आहारात तूप, लोणी, मसूर, दूध, केळी, रताळ्यांसोबत हिरव्या भाज्यांचा समावेश करा. मुलांना निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा 1. केळी शेक केळी हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत आहे. अशक्त मुलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. त्याचा शेक किंवा दूध आणि केळी मुलांना खायला दिल्यास त्यांचं वजन वाढतं. 2. डाळी डाळी हा प्रथिनांचा सर्वांत मोठा स्त्रोत आहे. डाळ शिजवलेल्या पाण्यातही पुरेशा प्रमाणात प्रथिनं आढळतात. तुमच्या मुलांची प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सुदृढ बनवण्यासाठी त्याला नियमित डाळी शिजवलेलं पाणी प्यायला द्यावं. हे वाचा - पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, दारू पाजून पाय तारेनं बांधले अन्… 3. हिरव्या भाज्यांचे सेवन हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्त्वं असतात. मुलांना ब्रोकोली, बटाटे, वाटाणे, पालक आणि कोबी नियमितपणे खायला द्यावे. याच्यामुळं बालकाला चवीबरोबरच पोषणही मिळेल. 4. अंडी आणि बटाटा अंडी आणि बटाटे अशक्त मुलांसाठी खूप फायदेशीर असू शकतात. कारण, बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि अंड्यांमध्ये प्रोटीन असतं. हे नियमित खाण्यामुळं मुलांसह घरातील सर्वांनाच चांगलं पोषण मिळेल. हे वाचा - प्रेमविवाहानंतर पहिल्यांदाच पत्नीला विना मेकअप पाहून हादरला पती; उचललं मोठं पाऊल, जाणून व्हाल हैराण 5. तूप किंवा लोणी डॉ.रंजना सिंह यांच्या मते तूप आणि लोणी हे चरबीयुक्त पदार्थ आहेत. मुलांनी याचे नियमित सेवन करावे. तूप आणि लोणी डाळ किंवा रोटीमध्ये घालून सेवन करता येते. 6. मलई दूध मलईच्या दुधात पुरेशा प्रमाणात फॅट आढळते, जे मुलांचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. जर मुलाने दूध पिण्यास नकार दिला तर त्याला शेक किंवा चॉकलेट पावडर मिसळून खायला द्या.
  Published by:News18 Desk
  First published: