नवी दिल्ली, 29 जानेवारी : रोज एक सफरचंद
(Apple) खाल्याने आपण सर्व प्रकारे निरोगी राहू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण सफरचंदात अनेक पोषक तत्व
(Benefits of apple) आढळतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. ऊर्जा आणि पाण्याव्यतिरिक्त, सफरचंदमध्ये जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडेंट, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि के किंवा व्हिटॅमिन बी -6 सारखे सर्व पोषक घटक (Nutrients) असतात. असं विविध पोषक घटकांनी युक्त आरोग्यासाठी वरदान मानलं जाणारं सफरचंद खाण्याचीही एक पद्धत असतं.
अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो की, सफरचंद सोलून खाणे फायदेशीर आहे की न सोलता? सफरचंद कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात खावे जेणेकरून सफरचंदाचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशाच काही प्रश्नांची उत्तरे येथे (Tips to Eat Apple) जाणून घेऊया.
सफरचंदाच्या सालीचे फायदे
सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर फायबर असतात. त्यामुळे ती खाल्ल्याने पोटातील बद्धकोष्ठतेच्या समस्येवर बराच आराम मिळतो. त्यामुळे सफरचंदाची साल खाणे फायदेशीर ठरते. पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सफरचंदाची साल न खाता फक्त गर खाणे देखील आरोग्यास फायदेशीर ठरते.
सफरचंद धुवा
सफरचंद खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुणे आवश्यक आहे. पण त्याची पद्धत आपण जाणून घेतली पाहिजे. सफरचंद धुण्यासाठी ते कोमट पाण्यात किमान अर्धा तास भिजवलेले असले पाहिजे. यामुळे आपल्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
हे वाचा - Fruit with Meals: आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण
सफरचंद खाण्याची वेळ
आहार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी सफरचंद खाऊ नये. दिवसा सफरचंद खाणे चांगले आहे आणि त्यातील पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी, सफरचंद रिकाम्या पोटी देखील खाऊ शकता.
किती प्रमाणात खावे
दिवसातून एक सफरचंद खाणे पुरेसे आहे. कारण त्यात कॅफिनही आढळते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून एक किंवा दोन सफरचंदांचे सेवन करा.
हे वाचा - Apple Shape: सफरचंदाचा आकार का असतो असा? जाणून घ्या मजेशीर Facts
सफरचंदांच्या अतिसेवनाचे तोटे
जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने काही समस्या उद्भवू शकतात. कारण यामुळे घसा किंवा जीभ आणि ओठांना सूज येऊ शकते. त्यामुळे सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका.
(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.