• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मेंदूची कार्यक्षमता राहील अगदी उत्तम; आहारात या गोष्टींचा समावेश ठरेल फायदेशीर

मेंदूची कार्यक्षमता राहील अगदी उत्तम; आहारात या गोष्टींचा समावेश ठरेल फायदेशीर

Keep Your Mind Young : वाढत्या वयाबरोबर लोकांना स्मृतिभ्रंश म्हणजेच विस्मरण होण्यास सुरुवात होते. मात्र, आताच्या काळात तर लहान मुलं आणि तरुणांनाही विस्मरण होत असल्याचं समोर येत आहे.

 • Share this:
  7नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : वयानुसार आपल्या मेंदूची (brain) कार्यक्षमता कमी होऊ लागते. वृद्धापकाळात मेंदूच्या पेशीही नष्ट होऊ लागतात. वाढत्या वयाबरोबर लोकांना स्मृतिभ्रंश म्हणजेच विस्मरण होण्यास सुरुवात होते हेही आपण अनेकदा पाहिलं असेल. आताच्या काळात तर लहान मुलं आणि तरुणांनाही विस्मरण होत असल्याचं समोर येत आहे. म्हणूनच, शरीर, मेंदू असं दोन्हीही तंदुरुस्त आणि तरुण कसं ठेवायचं हे जाणून घेतलं पाहिजे. मेंदू तरुण ठेवण्यासाठी इथं आम्ही काही टिप्स देत आहोत. त्यांचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करता येईल. यासाठी जीवनशैलीत आणि आहारात काही बदल आणि सुधारणा कराव्या (Keep Your brain Young) लागतील. आहारात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अ‌ॅसिडचा समावेश करा ओमेगा 3 आणि 6 अशी फॅटी अ‌ॅसिडस आहेत, जी शरीर आणि मेंदूसाठी कार्य करतात. त्यांच्या मदतीनं डोपामाइन सेरोटोनिनसारखे हार्मोन्स स्रवतात. हे आपल्याला आनंद देणारे हार्मोन्स आहेत. ही फॅटी अॅसिडस् मासे, अक्रोड, काजू, बदाम, शेंगदाणे, पालेभाज्या आणि अंडी यामध्ये आढळतात. कार्बोहायड्रेट्स गरजेचे आजकाल लोक बारीक राहण्यासाठी त्यांच्या आहारातून कार्बोहायड्रेट्स काढून टाकत आहेत. याचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूचं कार्य नीट होण्यासाठी कर्बोदकं आवश्यक असतात. म्हणूनच, आपल्या आहारात फायबर स्टार्चचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. बटाटे, रताळे, तांदूळ आदींमध्ये कार्बोहायड्रेट्स आढळतात. ते सावकाश ग्लुकोज सोडतात. हे वाचा - अफगाणिस्तानच्या विजयानंतर Team India ला मोठा धोका, पूर्ण होईल का सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न? भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये बी जीवनसत्त्वं आणि झिंकसारखे पोषक घटक असतात. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ देखील असतं. त्यांचा आहारात समावेश नक्की करा. दालचिनी दालचिनीमध्ये कोलेस्टेरॉल कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळं मेंदूही तीक्ष्ण बनतो. हे वाचा - संतापजनक! दुप्पट वयाच्या तरुणाशी लावला बालविवाह; काही दिवसातच मुलीचा भयावह मृत्यू तसेच आपल्या आहारात संपूर्ण/अखंड धान्यांचा (Whole Grains) समावेश करा. आहारात ज्वारी, बाजरी, तपकिरी तांदूळ (Brown Rice) आणि गहू यासारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा. याशिवाय अळशीच्या बियाही (Flaxceeds) खा. /eमध्ये फायबर, प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. (या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: