Home /News /lifestyle /

Health Tips: कोणत्या टॉनिकपेक्षा कमी नाही गूळ-हरभरा; एकत्र खाण्याने होतो बराच फायदा

Health Tips: कोणत्या टॉनिकपेक्षा कमी नाही गूळ-हरभरा; एकत्र खाण्याने होतो बराच फायदा

भाजलेले हरभरे लोह आणि प्रथिनांनी समृद्ध आहेत आणि गूळ देखील लोहचा चांगला स्त्रोत आहे. या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीरातील लोह आणि प्रथिनांची कमतरता पूर्ण होते.

    नवी दिल्ली, 03 ऑक्टोंबर : तुम्ही गुळ (jaggery) खाण्यामुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल ऐकले असेल तसेच हरभरादेखील ताकद वाढीसाठी उपयुक्त असल्याचे अनेकांना माहीत आहे. मात्र, गुळ आणि हरभरे (gram) एकत्र खाण्याच्या फायद्यांबद्दल तुम्ही कदाचित ऐकले नसेल. गूळ आणि हरभरा स्वतंत्रपणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतातच. त्याशिवाय दोन्ही एकत्र खाल्ल्याने त्यांच्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. गूळ आणि हरभरा ( jaggery gram benefits for health) एकत्र खाल्ल्याने ते सुपर फूडसारखे काम करते. आज गूळ आणि हरभरा एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊया. रक्त वाढीसाठी उपयुक्त जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते, तेव्हा ती वाढवण्यासाठी विविध प्रकार अवलंबले जातात. घरगुती उपायांबरोबरच विविध महागडी औषधे आणि टॉनिक घेतली जातात. पण गूळ आणि हरभऱ्यासारख्या साध्या गोष्टी आपण खाणे विसरून जातो. गूळ-हरभरा एकत्र सेवन केल्याने रक्त वाढून अशक्तपणाची समस्या दूर होण्यास मदत होते. यासह, ऊर्जा आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी देखील हा खूप प्रभावी उपाय आहे. हे वाचा -केस विंचरण्याचीही असते विशिष्ट वेळ आणि पद्धत; तुम्हाला माहिती आहे का? लोह आणि प्रथिनांची कमतरता होईल दूर भाजलेले हरभरे लोह आणि प्रथिनांनी समृद्ध आहेत आणि गूळ देखील लोहचा चांगला स्त्रोत आहे. या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीरातील लोह आणि प्रथिनांची कमतरता पूर्ण होते. यासह त्यात असलेले इतर पोषक घटक देखील शरीराच्या इतर अनेक गरजा पूर्ण करतात. हाडे मजबूत होतात हाडे मजबूत करण्यासाठी गूळ-हरभरा यांचे एकत्र सेवन फायदेशीर ठरते. वृद्धत्वामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत त्यांची ताकद टिकवण्यासाठी गूळ-हरभरा खाऊ शकतो. हे हाडांची खनिज घनता राखण्यास मदत करेल. हे वाचा - हावरटपणा भोवला; लग्नात जास्त केक खाणाऱ्यांना नवरी-नवरदेवानं पाठवले विचित्र मेसेज, पाहून पाहुणे हादरले पचन चांगले होईल गूळ आणि हरभऱ्यामध्ये भरपूर फायबर असताच. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने पचन सुधारण्यास मदत होते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि आंबटपणाची समस्या दूर होते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या