नवी दिल्ली, 15 डिसेंबर : भोपळा (pumpkin) मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. भोपळा हे खूप कमी कॅलरी असलेलं अन्न आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे सर्वच दृष्टींनी आरोग्यासाठी चांगले मानले जातात. 120 ग्रॅम भोपळ्यामध्ये 2 ग्रॅम प्रथिनं, 11 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम फायबर, 4 ग्रॅम साखर असते. याशिवाय भोपळ्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि प्रोव्हिटामिन 'ए'देखील आढळतात. शिवाय, महत्त्वाचं म्हणजे, भोपळा फक्त 50 कॅलरीज ऊर्जा देतो. भोपळ्यामध्ये फॅट अजिबात मिळत नाही. म्हणूनच तो हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही (pumpkin beneficial for diabetic patient) चांगलं काम करतो.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये (diabetic patient) रक्तातील साखर कमी करण्यासाठी भोपळ्याची मदत होते का, मधुमेहींनी भोपळा खावा की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. भोपळ्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि साखर दोन्ही आढळतात. म्हणूनच काही लोकांना शंका वाटते की, यामुळं रक्तातील साखर वाढू शकते. हेल्थलाइनकोच्या बातमीनुसार, भोपळा मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. कारण, भोपळ्यामध्ये असलेलं फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतं.
10 पेक्षा कमी GL मधुमेहींसाठी वाईट नाही
हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, भोपळ्याचा जीआय 75 आहे आणि जीएल केवळ 3 आहे. GI म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि GL म्हणजे ग्लायसेमिक लोड (GL) म्हणजे कार्बोहायड्रेट्स, साखर किंवा अन्नातील स्टार्च यांमुळे रक्तातील साखर तयार करण्याची शरीराची क्षमता. हे एक प्रकारे अन्नाच्या क्रमवारीचं मोजमाप आहे. यातून कोणत्याही अन्नपदार्थामध्ये रक्तातील साखर वाढवण्याची क्षमता किती आहे, हे दर्शवलं जातं.
हे वाचा - Paytm द्वारे LPG Cylinder बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, पाहा काय आहे ऑफर
सामान्यतः असं मानलं जातं की, जर GL 10 च्या खाली असेल तर, त्याचा रक्तातील साखरेवर विशेष परिणाम होत नाही. दुसरीकडे, GI 1 ते 100 च्या दरम्यान मोजला जातो. यावरूनही रक्तातील साखरेचं प्रमाण किती प्रमाणात वाढू शकतं, ते समजतं. अन्नाचा जीआय जितका जास्त असेल तितकी त्यामुळं रक्तातील साखर वाढते आणि भोपळ्याचा जीआय 75 आहे.
हे वाचा - Dreams Signs: अशी स्वप्नं तुम्हालाही पडतात का? भविष्यात भरपूर पैसा मिळण्याचे असे असतात संकेत
मध्यम प्रमाणात फायदेशीर
भोपळ्यातील जीआय आणि जीएलचं मोजमाप केलं तर, मधुमेही रुग्णांनी मर्यादित प्रमाणात भोपळा खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही. मात्र, त्यांनी भोपळा जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Tips for diabetes