Home /News /lifestyle /

Intermittent Fasting: जेवणामध्ये 10 ते 12 तासांचा गॅप यासाठी आहे उपयोगी; गंभीर आजारही राहतात दूर

Intermittent Fasting: जेवणामध्ये 10 ते 12 तासांचा गॅप यासाठी आहे उपयोगी; गंभीर आजारही राहतात दूर

Intermittent fasting will keep you away from serious diseases : इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला लठ्ठपणा कमी करायचा असतो, तेव्हा ती व्यक्ती अधूनमधून उपवास करते. उपवास आणि खाण्याच्या कालावधीमध्ये 16 तासांचं चक्र असतं ज्यामध्ये कधी खावं हे ठरवलं जातं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी : सहसा जेव्हा आपण लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही करण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम आपण आपला डाएट प्लॅन (Diet plan) बनवतो आणि वर्कआउटचा विचार करतो. हल्ली इंटरनेटवर अनेक प्रकारचे डाएट प्लॅन उपलब्ध आहेत आणि लोक त्यांच्या सोयीनुसार त्यांचा आहार निश्चित करतात. यापैकी एक अतिशय लोकप्रिय आहार पद्धती आहे, ती म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting). इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला लठ्ठपणा कमी करायचा असतो, तेव्हा ती व्यक्ती अधूनमधून उपवास करते. उपवास आणि खाण्याच्या कालावधीमध्ये 16 तासांचं चक्र असतं ज्यामध्ये कधी खावं हे ठरवलं जातं. मात्र, हे करताना निष्काळजी राहिल्यास त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे 24 पैकी 12-14 तास तुम्ही न खाता राहिल्यास याच्यामुळं तुमचं शरीर अनेक गंभीर आजारांपासून (Intermittent fasting will keep you away from serious diseases) दूर राहू शकता. एका अभ्यासात असे आढळून आलंय की, अधूनमधून उपवास केल्यानं महिलांचं वजन कमी होतंच, शिवाय त्यांच्या शरीराला मधुमेह आणि बीपीसारख्या गंभीर आजारांपासूनही संरक्षण मिळतं. दीर्घ काळासाठी काही न खाता नंतर अन्न खाल्ल्यानं ते पचायलाही पुरेसा वेळ मिळतो. हे वाचा - Children’s height : आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात? कारणही आहे तसंच खास तज्ज्ञ काय म्हणतात? कॅलिफोर्नियातील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजचे (Salk Institute for Biological Studies) प्राध्यापक सच्चिदानंद पांडा (Satchidananda Panda) यांनी एका अभ्यासात जीन्स आणि सर्केडियन क्लॉक (circadian clock) यांच्यातील संबंध स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केलं की, बहुतेक लोक संपूर्ण दिवसाचं अन्न 15 तासांत खातात. तर, डाएटिंगमध्ये किती आणि काय खात आहोत, यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आपण किती वेळांत ते अन्न खात आहोत, ही असते. हे वाचा - Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा जर आपण रात्रीचं जेवण करत असू तर, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच खावं. त्यामुळं ते पचायला 5 तास लागतात आणि त्यातून पोषक द्रव्यं काढायला अजून 5 तास लागू शकतात. म्हणून, जितका वेळ आपण अन्न खात नाही, तितका वेळ आपल्या शरीराचे इतर भाग स्वतःला बरं करतात. जर तुम्ही दिवसातून 8 तास ते 10 तासांच्या आत खाल्लं, तर तुमच्या शरीरातील अवयवांना सुमारे 14 ते 16 तास विश्रांती मिळेल आणि तुम्ही आजारांपासून स्वतःचं संरक्षण करू शकाल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या