मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या उन्हाळ्याच्या दिवसात थकवा-अशक्तपणा, सुस्ती जराही नाही जाणवणार; आहारात घ्या हे 6 पदार्थ

या उन्हाळ्याच्या दिवसात थकवा-अशक्तपणा, सुस्ती जराही नाही जाणवणार; आहारात घ्या हे 6 पदार्थ

या ऋतूमध्ये भूक कमी आणि तहान जास्त लागते. यामुळेच शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि आपल्याला थकवा, अशक्त आणि अस्वस्थ वाटू लागतं. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास शरीराला कोणत्याही हवामानाशी लढण्याची ताकद मिळते.

या ऋतूमध्ये भूक कमी आणि तहान जास्त लागते. यामुळेच शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि आपल्याला थकवा, अशक्त आणि अस्वस्थ वाटू लागतं. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास शरीराला कोणत्याही हवामानाशी लढण्याची ताकद मिळते.

या ऋतूमध्ये भूक कमी आणि तहान जास्त लागते. यामुळेच शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि आपल्याला थकवा, अशक्त आणि अस्वस्थ वाटू लागतं. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास शरीराला कोणत्याही हवामानाशी लढण्याची ताकद मिळते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 07 मे : उन्हाळ्यात उन्हामुळे आणि घामामुळे आपण लवकर थकतो. थोडे काम केले तरी कपडे घामाने भिजतात. थोड्याच वेळात दम लागतो. सूर्याची उष्णता शरीरातील शक्ती शोषून घेते आणि आपण थकून जातो. या ऋतूमध्ये भूक कमी आणि तहान जास्त लागते. यामुळेच शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि आपल्याला थकवा, अशक्त आणि अस्वस्थ वाटू लागतं. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास शरीराला कोणत्याही हवामानाशी लढण्याची ताकद मिळते. त्याचप्रमाणे या कडक उन्हाळ्यात योग्य आहार प्लॅनिंग केल्यास थकवा, अशक्तपणा आणि अस्वस्थता ही लक्षणे टाळण्यास (summer health tips) मदत होते. नाश्त्यासाठी दूध-अंडी सकाळी चांगला नाश्ता केला तर आपल्याला दिवसभर मेहनत करण्याची ताकद मिळते. म्हणजे सकाळचा योग्य आहार एखाद्या व्यक्तीला दिवसभर निरोगी आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात दूध आणि अंडी घेतल्यास दिवसभर उत्साही राहण्यासाठी हा उत्तम पर्याय असेल. अंड्यांमध्ये अमिनो अॅसिड आणि भरपूर प्रमाणात चांगली चरबी असते. दुसरीकडे, दुधात कॅल्शियम आणि प्रथिने जास्त असतात. नाश्त्यासाठी स्प्राउट्स - जे लोक अंडी खात नाहीत ते त्यांच्या नाश्त्यामध्ये मूग स्प्राउट्स, शेंगा, सुकामेवा आणि वेगवेगळ्या बिया यांसारख्या स्नॅक्सचा समावेश करू शकतात. या गोष्टींमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याची अधिक शक्यता असल्याने, लिंबूपाणी, बार्ली आणि नारळपाणी यांसारखे आरोग्यदायी पर्यायही फायदेशीर आहेत. भरपूर हंगामी फळे खा - उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात टरबूज, कॅनटालूप, अननस, आंबा, स्ट्रॉबेरी, संत्री आणि इतर फळं खा. ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. ते निर्जलीकरण रोखण्यासाठी प्रभावी आहेत. खाण्यापूर्वी ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये साठवणे हा हायड्रेट आणि थंड करण्याचा एक मार्ग आहे. अधिक हिरव्या भाज्या खा - उन्हाळ्यात दोडका, दुधी भोपळा, टिंडा, ब्रोकोली, कारली इत्यादी भाज्या खाण्याचं प्रमाण वाढवा. डिहायड्रेशनपासून तुमचं संरक्षण करण्यास मदत होते. आपण अॅक्टीव राहतो, या भाज्यांमध्ये भरपूर पाणी आणि पोटॅशियम असतात, जे उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात. हे वाचा - कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांची अशी घ्या काळजी; होणार नाही कसलाही त्रास शरीरात पाण्याची कमतरता नको - उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे जास्त साधे पाणी पिणे टाळा, कारण ते तुमच्या शरीरातील खनिजे काढून टाकते. त्याऐवजी, ग्रीन टी, लिंबूपाणी किंवा ताजे नारळाचे पाणी तुमचे शरीर आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वा गरज पूर्ण करेल. ही पेये तुम्हाला दुपारी तरतरीत करण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी सर्वोत्तम आहेत. हे वाचा - कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs मसाले देखील आवश्यक - काहीजण उन्हाळ्यात मसाले खाणे बंद करतात. परंतु तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की थोड्या प्रमाणात मसाले तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि थकवा आणि संसर्गापासून तुमचे रक्षण करतात. आले, काळी मिरी, दालचिनी, लसूण इत्यादी काही पदार्थ आहेत जे आपण उन्हाळ्याच्या आहारातही घेऊ शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health Tips, Summer, Summer season

पुढील बातम्या