Home /News /lifestyle /

वयाच्या 40 नंतरही पंचवीशीतील तारुण्याचा हा आहे फंडा, फक्त लाइफस्टाईलमध्ये करा असे बदल

वयाच्या 40 नंतरही पंचवीशीतील तारुण्याचा हा आहे फंडा, फक्त लाइफस्टाईलमध्ये करा असे बदल

Tips For Preventing Ageing Effects: वृद्धत्व थांबवणं आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तरीही, आपण आरोग्याशी संबंधित काही उपाय केले तर वाढत्या वयाचे हे परिणाम बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात.

    नवी दिल्ली, 15 जानेवारी : वयाच्या 40 व्या वर्षानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं (Wrinkles) दिसू लागतात. तसंच, शरीरात ऊर्जेची पातळी कमी झाल्याचं जाणवू लागतं. म्हणजेच, वृद्धत्वाची सुरुवात होत असल्याचं लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. हा प्रभाव विशेषतः महिलांमध्ये दिसून येतो. त्यामुळं या काळात आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. खरं तर, वृद्धत्व थांबवणं आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तरीही, आपण आरोग्याशी संबंधित काही उपाय केले तर वाढत्या वयाचे हे परिणाम बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. तसं हे उपाय कठीण नाहीत कारण ते म्हणजे आपल्या जीवनशैलीशी संबंधित काही आवश्यक पद्धती आणि सवयी आहेत. ज्याचा अवलंब करून आपण वयाच्या 40 किंवा त्याहून अधिक वयातही पूर्णपणे तंदुरुस्त आणि तरुण दिसू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया अशाच (Tips For Preventing Ageing Effects) काही उपायांबद्दल. तुमच्या आहारात विविध प्रकारच्या बियांचा आणि डाळींचा समावेश करा डाळी आणि बियांमध्ये प्रथिनं (Vegetable-protein) चांगल्या प्रमाणात आढळतात. आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडं केवळ प्रथिनांनीच बनतात आणि मजबूत होतात. याशिवाय, बिया आणि डाळी सर्व प्रकारच्या खनिजं आणि फायबरचे देखील चांगले स्त्रोत आहेत. याव्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स (Phytonutrients) देखील आढळतात, जे आपली जैविक प्रणाली राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया किंवा डाळी एकत्र करून त्यांचं सेवन करणं चांगलं. कारण अशा प्रकारे आपल्याला शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व अमीनो-अॅसिड्स पुरेशा प्रमाणात मिळतात आणि अशा प्रकारे आपल्या प्रथिनांशी संबंधित सर्व गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. यासाठी हरभरा, भुईमूग, मूग, उडीद किंवा राजमा आदींच्या बियांव्यतिरिक्त सूर्यफूल, भोपळा आदी बियांचंही आपण सेवन करू शकतो. दह्याचा आहारात समावेश करा दह्यामध्ये चांगले जीवाणू (goog bacteria or probiotics) आढळतात. ते संपूर्ण शरीराच्या आरोग्यासह विशेषतः आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळंच दही अनेकदा आरोग्यासाठी दुधापेक्षाही अधिक फायदेशीर मानलं जातं. त्याचं सेवन आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. दह्यामध्ये प्रथिनं, फॅट आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळतं. यासोबतच जवळपास सर्व जीवनसत्त्वंही दह्यामध्ये आढळतात. जे आपला शरीराचा तरुणपणा किंवा चैतन्य टिकवून ठेवण्याचं काम करतात. दह्याचं नियमित सेवन वृद्धत्वाचा प्रभाव थांबवून आपल्याला तरुण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची सवय बदला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण रात्री लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. रात्रीचे जेवण आणि त्यानंतरचं झोपणं यात दोन तासांचं अंतर असलं पाहिजे. मात्र, आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण अनेकदा रात्री उशिरा जेवतो आणि त्यानंतर लगेच झोपतो. याचा परिणाम असा होतो की, आपल्या शरीरातील चरबी आणि कर्बोदकं यांसारखे ऊर्जा देणारे घटक योग्यरित्या बर्न होऊ शकत नाहीत. त्यामुळं आपल्याला मधुमेह किंवा हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या समस्या विशेषत: वाढत्या वयात दिसून येतात. त्यामुळं या युगात आरोग्य राखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत लवकर जेवून झोपण्याची सवय लावली पाहिजे. हे वाचा - Vastu Tips: नवरा-बायकोमधील वाद, कुटुंब कलह नाहीसे होतील; या 10 वास्तू टिप्स ध्यानात ठेवा पूरक जीवनसत्त्वं (व्हिटॅमिन सप्लीमेंट्स - Vitamin supplements) घ्या सर्वसाधारणपणे, आपल्यापैकी प्रत्येकजण पुरेसं दूध, फळं किंवा हिरव्या हंगामी भाज्यांचं सेवन करू शकत नाही. म्हणजेच संतुलित आहार घेऊ शकत नाही. याचा परिणाम असा होतो की, आपल्याला काही पोषक तत्त्वांची, विशेषतः जीवनसत्त्वांची कमतरता भासते. त्यामुळं वाढत्या वयात ही कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेणं हा सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करू शकता. हे वाचा - Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल; लाइफस्टाइलमध्ये करा फक्त हे दोन बदल हिरव्या भाज्या आणि फळं खा याशिवाय फळं आणि हिरव्या भाज्यांचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे. कारण या नैसर्गिक स्रोतांच्या पोषकतत्त्वांमध्ये जीवनसत्त्वांव्यतिरिक्त फायटोकेमिकल्सचा समावेश होतो. याच्यामुळं आपण स्वतःला वृद्धत्वाच्या प्रभावापासून मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या