मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नजर बनते तीक्ष्ण, डोळे दीर्घायुष्य राहतील चांगले; बसल्या-बसल्या 2 मिनिटात करा हे काम

नजर बनते तीक्ष्ण, डोळे दीर्घायुष्य राहतील चांगले; बसल्या-बसल्या 2 मिनिटात करा हे काम

तुमचे डोळे खराब होऊ नयेत, डोळ्यांचे आजार होऊ नयेत असे वाटत असेल, तर डोळे निरोगी राहण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे (Eye Care Tips) सोपे उपाय नक्की करा.

तुमचे डोळे खराब होऊ नयेत, डोळ्यांचे आजार होऊ नयेत असे वाटत असेल, तर डोळे निरोगी राहण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे (Eye Care Tips) सोपे उपाय नक्की करा.

तुमचे डोळे खराब होऊ नयेत, डोळ्यांचे आजार होऊ नयेत असे वाटत असेल, तर डोळे निरोगी राहण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे (Eye Care Tips) सोपे उपाय नक्की करा.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोनाच्या काळात लोकांचा स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळं तर जे काम लोक ऑफिसमध्ये 9-10 तासांत पूर्ण करायचे, तेच काम आता काहींचे 13-14 तासांत पूर्ण होत आहे. याशिवाय घराबाहेर जास्त न निघाल्याने लोकांचा मोकळा वेळ मोबाईल, टीव्ही पाहण्यातच जातो. या सवयींचा सर्वाधिक वाईट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर झाला आहे. आजकाल बहुतेक लोकांना डोळ्यात जळजळ, अस्पष्ट दृष्टी, डोळे पाणावणं, कमकुवत दृष्टी (eyesight) यांसारख्या समस्यांचा त्रास होतो. तुमचे डोळे खराब होऊ नयेत, डोळ्यांचे आजार होऊ नयेत असे वाटत असेल, तर डोळे निरोगी राहण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे (Eye Care Tips) सोपे उपाय नक्की करा.

दृष्टी वाढवण्याचे नैसर्गिक मार्ग

पामिंग व्यायाम करा

OnlyMyHealth मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पामिंग व्यायाम केल्याने दृष्टी सुधारते. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. थकवा निघून जातो. पामिंग व्यायाम करण्यासाठी तुमचे दोन्ही हाताचे तळवे एकत्र घासून काही सेकंद डोळ्यांवर ठेवा. असे 5-7 वेळा करा. डोळ्यांचा सर्व थकवा निघून जाईल.

डोळे गोल फिरवा

मोबाईल बघताना किंवा लॅपटॉपवर तासनतास काम करताना डोळे थकले तर कामातून ब्रेक घ्या. आपले डोळे एका वर्तुळात हलवण्याचा प्रयत्न करा. डोळे किमान 5 वेळा घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवा. असे दिवसातून दोनदा करा, दृष्टी वाढेल, डोळे दीर्घायुष्यासाठी निरोगी राहतील.

डोळे मिचकाव

मधेच पापण्या मिचकावल्याने डोळ्यांवरील ताण आणि स्ट्रेनही कमी होतो. 2 सेकंद डोळे बंद करा, नंतर उघडा आणि 5 सेकंद सतत ब्लिंक करा. हे किमान 5-7 वेळा पुन्हा करा. असं केल्यानं डोळ्यांचा थकवा आणि डोळे लाल होण्याचा त्रास कमी होईल.

हे वाचा - बिनधास्त करा अनोळखी व्यक्तींसोबत Romance, 'हे' देश आहेत टॉप लिस्टमध्ये

20-20-20 नियम पाळा

डोळे निरोगी ठेवण्याचा हा एक अतिशय सोपा आणि ट्रेंडी मार्ग आहे. नेत्र विशेषज्ञ देखील हे करण्याची शिफारस करतात. या 20-20-20 नियमात, तुम्हाला फक्त लॅपटॉपवर काम करताना दर 20 मिनिटांनी ब्रेक घेऊन तुमच्यापासून किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहायचे आहे. या व्यायामामुळे दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते.

हे वाचा - वेलची ब्रेस्ट कॅन्सर उपचारात प्रभावी! अमेरिकन संशोधनातून शिक्कामोर्तब

डोळे निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्या

वेबएमडीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेव्हा तुमच्या ताटामध्ये आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश असेल तेव्हाच डोळे निरोगी राहतील. ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, झिंक, व्हिटॅमिन सी, ई यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने वृद्धत्वामुळे दृष्टी कमकुवत होण्याची समस्या जसे की मॅक्युलर डिजेनेरेशन, मोतीबिंदू यासारख्या समस्या बर्‍याच प्रमाणात टाळता येतात. अशा परिस्थितीत हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, ऑईली फिश जसे की ट्युना, सॅल्मन, अंडी, सुका मेवा, बीन्स, नॉनमीट प्रोटीन फूड स्त्रोत, लिंबूवर्गीय फळे किंवा लिंबू, संत्री इत्यादींचा रस रोजच्या आहारात घेतला पाहिजे. डोळे दीर्घायुष्यासाठी निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच धुम्रपान, मद्यपान यांसारख्या हानिकारक सवयीही मर्यादित ठेवा. डोळ्यांची तपासणीसाठी डॉक्टरांकडे जा. आजकाल लहान मुलांचे डोळे लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत त्यांची नियमित नेत्रतपासणी करणे आवश्यक आहे.

(सूचना : य़ेथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Eyes damage, Health Tips