मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हालाही नीट दिसत नाही का? डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी या घरगुती उपायांचा करा अवलंब

तुम्हालाही नीट दिसत नाही का? डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी या घरगुती उपायांचा करा अवलंब

How To Improve Eyesight : डोळे खूप नाजूक असतात. याच डोळ्यांमुळं, आपण आपल्या सभोवतालचं जग पाहू शकतो आणि सहज जीवन जगू शकतो. डोळ्यांशी संबंधित काही समस्येमुळं दृष्टी कमजोर झाली तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : आपले डोळे खूप नाजूक असतात. याच डोळ्यांमुळं, आपण आपल्या सभोवतालचं जग पाहू शकतो आणि सहज जीवन जगू शकतो. डोळ्यांशी संबंधित काही समस्येमुळं दृष्टी कमजोर झाली तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला चष्म्याची मदत घ्यावी लागते. याशिवाय, डॉक्टर काळजी घेण्याच्या सर्व प्रकारच्या पद्धतीही सुचवतात. मात्र, त्यांच्या डोळ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, ज्यांचा अवलंब लोक वर्षानुवर्षं करत आहेत. चला तर मग, जाणून घेऊया दृष्टी वाढवणाऱ्या (How To Improve Eyesight at home) घरगुती पद्धतींबाबत.

1. गुलाब पाण्याचा वापर

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण गुलाबपाणी वापरतो. मात्र, ते डोळ्यांसाठीही खूप प्रभावी मानलं गेलंय. गुलाब पाण्याच्या मदतीनं डोळ्यांची दृष्टी वाढवता येते, असं संशोधनात आढळून आलंय. आठवड्यातून दोन ते तीन वेळा गुलाब पाण्याचे दोन ते तीन थेंब तुम्ही डोळ्यांत टाकू शकता. पण हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

2.मोहरीचं तेल वापरणं

तुम्ही मोहरीच्या तेलानं दररोज सुमारं 10 मिनिटं पायाला मालिश केलीत तर, तुमची दिसण्याची क्षमता वाढते, असंही संशोधनात आढळून आलंय.

3.व्यायाम

वाढत्या वजनामुळं टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दृष्टीसाठी संतुलित वजन आवश्यक आहे. तुम्ही नियमित व्यायाम करून तुमचे डोळे निरोगी ठेवू शकता.

हे वाचा - प्रेमात आंधळी झालेल्या महिलेनं सुखी संसाराचा केला सत्यानाश; Boyfriend साठी पतीला सोडलं पण…

4. बदाम खाणं

एका अभ्यासानुसार बदामामध्ये विटामिन-ए मुबलक प्रमाणात आढळतं. बदाम दुधात मिसळून खाल्ल्यास त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन-एमुळं दृष्टी वाढण्यास मदत होते.

हे वाचा - विमानातल्या प्रवाशाची बिघडली तब्येत, केंद्रीय मंत्री कराडांनी वाचवले प्राण; मोदींनीही केलं कौतुक

5. आवळ्याचं सेवन

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं, जे अँटिऑक्सिडंट्सनं समृद्ध असतं. अँटिऑक्सिडंट्स रेटिनाला निरोगी ठेवण्याचं काम करतात.

6. आहारात या गोष्टींचा समावेश करा

आपली दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात गाजर, ब्रोकोली, अक्रोड, पालक आणि केळं यांचा नक्कीच समावेश करा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Eyes damage, Health Tips