Home /News /lifestyle /

Anger Management Tips: भाऊ, राग लई वाईट.. तुम्हाला माहीत नसेल आतल्या-आत शरीराची काय अवस्था होते

Anger Management Tips: भाऊ, राग लई वाईट.. तुम्हाला माहीत नसेल आतल्या-आत शरीराची काय अवस्था होते

How to control anger: बरेच लोक त्यांचा राग बोलून दाखवतात, परंतु काही लोक तो मनामध्ये तसाच ठेवतात. राग कोणत्याही परिस्थितीत धोकादायक असतो. मात्र, राग मनात ठेवणे फार घातक आहे.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : आजच्या जीवनशैलीत बहुतेक लोक तणाव आणि चिंताग्रस्त (stress and anxiety) आहेत. रोजच्या दिनक्रमात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून आपल्याला दिवसातून कितीवेळा राग (Anger) येतो हे कळतदेखील नाही. बरेच लोक त्यांचा राग बोलून दाखवतात, परंतु काही लोक तो मनामध्ये तसाच ठेवतात. राग कोणत्याही परिस्थितीत धोकादायक असतो. मात्र, राग मनात ठेवणे फार घातक आहे. कारण माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि तणावाशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोका असतो. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट अँड व्हॅस्कुलर सायन्सेस (Max Institute of Heart and Vascular Sciences), दिल्लीचे डॉ. रजनीश मल्होत्रा (Dr Rajneesh Malhotra) यांनी राग व्यवस्थापनावर काही टिप्स दिल्या आहेत. डॉ. रजनीश म्हणतात की, रागाचे कारण ओळखा आणि तुमच्या जीवनशैलीत (Anger management tips) काही बदल करा. राग हा माणसाच्या भावना, विचार आणि वागणुकीचा परिणाम असतो, असे या अहवालात लिहिले आहे. त्यामुळे शरीरातील तणाव वाढत जातो. त्यामुळे एड्रेनल ग्रंथी अॅड्रेनालाईन आणि कोर्टिसोल सारख्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतात. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, मेंदू आतड्यांमधून स्नायूंना रक्त पाठवतो, ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब आणि श्वासोच्छवासाची गती वाढते. रागामुळे स्ट्रेस हार्मोन्स (stress hormones) वाढत राहतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब (high blood pressure), डोकेदुखी, निद्रानाशाचा धोका वाढतो. इतकेच नाही तर त्याचा थेट परिणाम खाण्या-पिण्यावर झोपेवर आणि जीवनशैलीवर होतो. कॅलिफोर्निया विद्यापीठात केलेल्या अभ्यासानुसार, पिझ्झा, केक, तळलेले पदार्थ इत्यादी गोष्टी ट्रान्स फॅटी अ‌ॅसिड असलेले पदार्थ खाल्ल्यानं मेंदू ओमेगा-3 चा वापर कमी करू लागतो. ओमेगा-3 राग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. राग ओळखण्याचे आणि नियंत्रित करण्याचे उपाय ट्रिगर असे अनेक प्रसंग किंवा घटना असतात ज्यामुळं आपला राग वाढू शकतो. लांबलचक लागलेल्या रांगेत तुम्ही मागे उभे आहात, ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना, घरगुती वाद, अधिक थकवा आदींना ट्रिगर म्हणतात. तुम्ही जितके जास्त ट्रिगर ओळखू शकाल, तितकं रागावर नियंत्रण ठेवणं सोपं होईल. संकेत रागाचा थेट परिणाम शरीरावर होतो. रागावलेलं असताना वेळी हृदयाची गती वाढते. चेहरा लाल होतो. काही लोकांच्या मुठी आवळल्या जातात. डोळे लाल होऊ लागतात. या शारीरिक बदलांवर लक्ष ठेवा. संबंध हॉवर्ड इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीशी किंवा मित्राशी वाद होतो, तेव्हा त्या व्यक्तीसोबतच्या तुमच्या नातेसंबंधाचं महत्त्व काय आहे, याचा विचार पुन्हा पुन्हा करा. जेव्हा तुम्ही नातेसंबंधांना महत्त्व देता, तेव्हा राग नियंत्रित ठेवणं सोपं होईल. हे वाचा - तुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का? हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert झोप आणि व्यायामाचा फायदा कसा होईल? कमी झोपल्यानं राग वाढतो जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला 2 दिवस जरी दोन तास कमी झोप लागली, तर त्या व्यक्तीचा राग वाढू लागतो. अपुऱ्या झोपेनं चिंता, थकवा, ताणतणाव आणि दुःखाची भावना वाढते. त्यामुळं राग वाढतो. सततच्या तणावामुळं कोर्टिसोल हार्मोन वाढू लागतो. त्यामुळं रक्तदाब वाढतो. हे रागाचं मुख्य कारण आहे. अशा परिस्थितीत दररोज 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. हे वाचा - Children’s height : आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात? कारणही आहे तसंच खास व्यायामाचे फायदे अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या मते, 30 मिनिटांचा व्यायाम जसं की धावणं, वेगवान चालणं, सायकलिंग आणि पोहणं राग कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. वास्तविक, एरोबिक्स व्यायामासाठी अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. हे हृदय गती वाढवतं, ज्यामुळं फुफ्फुसीय प्रणाली जलद कार्य करते. यामुळं रक्तदाब आणि चिंता कमी होते. या दोन्ही बाबी रागासाठी कारणीभूत असतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या