मुंबई, 08 डिसेंबर : चिकनगुनिया (Chikungunya) हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि त्याची लक्षणं डेंग्यूसारखीच असतात. एडिस प्रजातीच्या डासांच्या (Mosquito) चावण्यामुळे होतो. चिकुनगुनियामुळे हात-पायांवर पुरळ उठणे, सांधेदुखी, अशक्तपणा जाणवणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा आणि ताप यासारख्या समस्यांना उद्भवतात. अनेकवेळा लोकांना काही कारणास्तव दवाखान्यात जाता येत नाही. तसंच, घरी बसूनही त्यावर योग्य उपचार (Treatment) करता येत नाहीत. कारण, त्यांना याबाबत माहिती नसते.
चिकनगुनियापासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय अवलंबू शकता ते सांगत (Tips to Get Rid of Chikungunya) आहोत.
पपईची पाने
चिकुनगुनिया झाल्यास पपईच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी सात ते आठ पानं घेऊन ती नीट धुवावीत. नंतर ती बारीक करून त्यांची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट पिळून त्याचा रस काढा. आता दर तीन तासांच्या अंतराने हा रस दोन चमचे रस घ्या.
लसूण
चिकुनगुनियाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्या आणि त्याची साल काढून बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट सांध्यावरील दुखणाऱ्या भागावर लावा.
गुळवेल
गुळवेल इतर अनेक आजारांसह चिकुनगुनियापासूनही आराम देण्यास उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही गुळवेलचा एक ग्रॅम रस किंवा एक गुळवेल कॅप्सूल घेऊ शकता.
हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल
शेवगा
चिकुनगुनियापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही शेवग्याचं (drumstick) सेवन करू शकता. तसंच, तुम्ही शेवग्याच्या बियांचं सूप बनवून त्याचं सेवन करू शकता.
दुग्ध उत्पादने
दुग्धजन्य पदार्थ चिकुनगुनियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत करतात. चिकुनगुनिया झाल्यास दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणं आवश्यक आहे.
हे वाचा - तामिळनाडूतील अपघातग्रस्त लष्कराच्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? यादी आली समोर
लिंबू-मध
चिकुनगुनियापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचंही सेवन करू शकता. यासाठी अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात मिसळा. नंतर त्यात एक चमचा मध त्यात मिसळा आणि त्यानंतर हे मिश्रण सेवन करा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Home remedies, Lifestyle