मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कसा करतात बर्पीज कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज? आरोग्याला मिळणारे फायदे आहेत खास

कसा करतात बर्पीज कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज? आरोग्याला मिळणारे फायदे आहेत खास

मुळात हा प्रकार दोन व्यायामांचे मिश्रण आहे. एक पुश-अप आणि एक जंप. हवेत उडी मारून पुश-अप करून बर्पीज केले जातात. बर्पीज व्यायाम प्रकाराचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.

मुळात हा प्रकार दोन व्यायामांचे मिश्रण आहे. एक पुश-अप आणि एक जंप. हवेत उडी मारून पुश-अप करून बर्पीज केले जातात. बर्पीज व्यायाम प्रकाराचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.

मुळात हा प्रकार दोन व्यायामांचे मिश्रण आहे. एक पुश-अप आणि एक जंप. हवेत उडी मारून पुश-अप करून बर्पीज केले जातात. बर्पीज व्यायाम प्रकाराचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : बर्पीज हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी एक आव्हानात्मक व्यायाम प्रकार आहे. जलद चरबी जाळण्यात आणि मजबूत मसल्स बनवण्यासाठी फायदेशीर आहे. कोणत्याही उपकरणाशिवाय केल्या जाणाऱ्या या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. पण, त्यासाठी ताकद आणि इच्छाशक्ती लागते. मुळात हा प्रकार दोन व्यायामांचे मिश्रण आहे. एक पुश-अप आणि एक जंप. हवेत उडी मारून पुश-अप करून बर्पीज केले जातात. एकापेक्षा जास्त बर्पीज केल्यानंतर कोणालाही (Benefits of Burpees) लगेच थकायला होतं. बर्पीज व्यायाम प्रकाराचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. बर्पीजचे योग्य तंत्र आणि शरीरासाठी त्याचे फायदे जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही दैनंदिन कार्डिओ रूटीनमध्ये याचा सहजपणे समावेश करू शकाल. बर्पीज कसे करावे? - शरीर सरळ ठेवून उभे रहा. - आता जमिनीला हात लावून स्क्वॅट स्थिती घ्या. - स्क्वॅटची स्थिती पुश-अप स्थितीत बदलताना आपला पाय मागे हलवा. - आता पूर्ण ताकतीने त्याच ठिकाणी हातांनी स्क्वॅट स्थितीत परत या. - एक लांब उडी घ्या आणि स्क्वॅट स्थितीत परत या. (लक्षात येत नसल्यास यूट्युबवर व्हिडिओ पाहा.) बर्पीजचे फायदे काय आहेत? अनेक स्नायू मजबूत - बर्पीजमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीराच्या बहुतेक मुख्य स्नायूंसाठी बर्पीजमुळे फायदा होतो. या व्यायामामुळे खांदे, हात, मुख्य स्नायू, ग्लूट्स आणि पोट मजबूत होण्यास मदत होते. हृदय गती वाढते - बर्पीज वर्कआउट्सला हाई-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT) रूटीन भाग असल्याचे म्हटले जाते. यामुळे आपल्या हृदयाची गती वाढते. त्यामुळे रक्ताचे योग्य पंपिंग, घाम येणं आणि फुफ्फुसांची उघडझाप अधिक व्यवस्थित होण्यास मदत करते. हे वाचा - या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; प्रशासनाने उचललं मोठं पाऊल कॅलरीज बर्न - हा वर्कआउट संपूर्ण शरीरासाठी उपयोगी आहे. चरबी कमी करण्यास आणि अतिरिक्त कॅलरी जलद बर्न करण्यास मदत होते. कारण, त्यासाठी शक्ती आवश्यक असते आणि अनेक स्नायूंचा वापर होतो, त्यामुळे असे केल्याने अधिक कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कोर स्नायू मजबूत करते कॅलरीज बर्न करण्याव्यतिरिक्त, बर्पीज आपल्या शरीराच्या मुख्य स्नायूंना मजबूत करण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर व्यायाम आहे. जर तुम्ही एब्सचे टार्गेट ठेवले असेल, तर बर्पी तुमच्यासाठी चमत्कारीक व्यायाम ठरू शकतो. हे वाचा - शरीरात रक्तवाढीसाठी या तीन गोष्टी ठरतील रामबाण, आहारात करा सामील पोस्श्चर आणि बॅलन्स सुधारतो- यामध्ये वेगवेगळे व्यायाम एकत्रितपणे करण्याची प्रक्रिया समाविष्ट असल्याने शरीरात संतुलन आणि समन्वय राखण्यास मदत होते. यासह, बर्पीज पोस्श्चर आणि गतिशीलता सुधारण्यास देखील मदत करतात. एका रॅपमध्ये कमीतकमी 10 बर्पी करा आणि सर्वोत्तम परिणामांसाठी दिवसातून 3 रॅप करा.
First published:

पुढील बातम्या