Home /News /lifestyle /

दिवसा तुम्ही किती वेळा कॉफी पिता? जास्त वेळा पिणाऱ्यांनी या 4 गोष्टी समजून घ्या

दिवसा तुम्ही किती वेळा कॉफी पिता? जास्त वेळा पिणाऱ्यांनी या 4 गोष्टी समजून घ्या

आपण थोडे सुस्त होऊ लागलो की, मग एक कप कॉफी आपल्याला फ्रेश बनवते. म्हणूनच काही लोक दिवसातून अनेक कप कॉफी पितात. कॉफी पिण्यासंबंधी या गोष्टींची माहिती जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 29 मे : तुम्ही कॉफी प्रेमी आहात का? मस्त सकाळी कडक कॉफीचा कप कोणाला आवडत नाही? एक कप कॉफीमध्ये तुमचा मूड चांगला करण्याची ताकद असते. बर्‍याच वेळा असे दिसून येते की, आपण थोडे सुस्त होऊ लागतो, मग एक कप कॉफी आपल्याला फ्रेश बनवते. म्हणूनच काही लोक दिवसातून अनेक कप कॉफी पितात. जास्त मीटिंग किंवा होस्टिंगमुळे अनेकदा जास्त कॉफी प्यायली जाते असे नाही, तर लोकांना स्वतःला त्याची सवय झालेली असते. कॉफीचे पिण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, खूप जास्त कॅफिन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. आज आपण जास्त कॉफी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. हृदयरोग (CVD) दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील ऑस्ट्रेलिया सेंटर फॉर प्रेसिजन हेल्थच्या अभ्यासानुसार, जे लोक दररोज तीन ते पाच कप कॉपी पितात त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील लिपिड्स (चरबी) च्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. हृदयविकाराचा धोका वाढतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज 3-5 कप कॉफी प्यायल्यानंतर पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत कोलेस्टेरॉलची पातळी अधिक असते. चिंता - कॉपी, एस्प्रेसोचे (Espresso) जास्त सेवन केल्याने लोकांना चिडचिड आणि अस्वस्थता जाणवू शकते. जी सामान्यतः एंग्जाइटीची लक्षणे असतात. कॉफी काही लोकांसाठी ऊर्जा बूस्टर असू शकते, परंतु ज्यांना एंग्जाइटीचा त्रास आहे, त्यांनी दुसरा कप घेण्यापूर्वी विचार करा. हार्मोनल बदल - जास्त प्रमाणात कॅफीन मानवी शरीराला उच्च सतर्कतेवर नेऊ शकतो आणि विचित्र समस्या निर्माण होऊ शकतात. इस्ट्रोजेनच्या पातळीत (एक प्रकारचा संप्रेरक) बदल स्त्रियांसाठी धोकादायक ठरू शकतो. हे वाचा - फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग निद्रानाश - जेव्हा जेव्हा आपल्याला झोप येते किंवा सुस्ती वाटते तेव्हा कॉफीमध्ये आपल्याला जागृत करण्याची शक्ती असते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने आवश्यक झोप मिळणे कठीण होऊ शकते. परंतु, कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण कमी किंवा मध्यम असल्यास ते पिणाऱ्यांच्या झोपेच्या चक्रावर परिणाम होत नाही. हे वाचा - टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस पूर्वीच्या अभ्यासातून असे सिद्ध होते की, दिवसातून पाच कप कॉफी पिणे सुरक्षित आणि आरोग्यदायी मानले जाते. पण आता कॉफी कपच्या या मर्यादेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चहा-कॉफी ही आरोग्यदायी पेय ठरू शकतात जर ती मर्यादित प्रमाणात घेतली गेली तर. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coffee, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या