Home /News /lifestyle /

Hot Water Benefits at Night: सकाळी ठीक आहे, पण रात्री गरम पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील

Hot Water Benefits at Night: सकाळी ठीक आहे, पण रात्री गरम पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील

Hot Water Benefits at Night : सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिणं फायदेशीर आहे, हे सर्वांना माहीत असतं. यासोबतच रात्रीही गरम पाणी पिणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया रात्री गरम पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत.

    मुंबई, 17 जानेवारी :  हिवाळ्यात आपल्यापैकी बरेच जण सकाळी उठून गरम पाणी (Hot Water) पितात. आंघोळीसाठीही गरम पाण्याचा वापर केला जातो. खरं तर, आपल्या शरीराला उष्णता देण्यासोबतच गरम पाण्याचा अनेक प्रकारे फायदाही होतो. पण गरम पाण्याचे हे फायदे फक्त सकाळीच नाही तर, रात्री पिण्यानेही मिळतात. गरम पाणी (Hot Water) आपल्या शरीराला विषारी पदार्थांपासून दूर करतं. तसंच आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतं आणि संसर्गजन्य रोगांपासून आपलं संरक्षण करतं. याच्या इतर फायद्यांसोबतच रात्री गरम पाणी प्यायल्यानंही (Hot Water Benefits at Night) झोप चांगली लागते. सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिणं फायदेशीर आहे, हे सर्वांना माहीत असतं. यासोबतच रात्रीही गरम पाणी पिणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया रात्री गरम पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत. स्थूलपणा कमी करण्यासाठी गरम पाणी स्थूलपणा कमी करण्यासाठी लोक सकाळी गरम पाणी पितात. यासोबतच रात्री गरम पाणी प्यायल्यानंही स्थूलपणा कमी होण्यास मदत होतं. गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. अशा प्रकारे, लठ्ठपणा किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी गरम पाणी खूप फायदेशीर ठरू शकतं. चांगली झोप आणि मानसिक आरोग्यासाठी गरम पाणी गरम पाणी प्यायल्यानं मानसिक नैराश्य दूर होतं. यामुळं डिप्रेशनच्या समस्येतही खूप आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्यानं आपल्या झोपेची गुणवत्ता वाढते आणि आपल्याला चांगली झोप लागते. त्यामुळं जर आपण तणावपूर्ण परिस्थितीत असाल किंवा झोपेची समस्या असेल तर गरम पाणी पिणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे वाचा - Covid Testing Kit: कोविड सेल्फ-टेस्टिंग किट्स खरंच किती विश्वसनीय आहे? डॉक्टरांनी सांगितले त्याविषयी गरम पाणी पचनास मदत करते गरम पाणी प्यायल्यानं अपचनाची समस्या दूर होऊन पचनक्रिया सुधारते. कारण गरम पाण्यामुळं पोटातील अन्न पचवण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पाचक रसांचा स्राव वाढतो. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर गॅस किंवा अॅसिडिटी होणंही टळतं. हे वाचा - Cholesterol Controlling Fruits: वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणायचंय नियंत्रणात; तुमच्यासाठी संजीवनी ठरती ही 5 फळं याशिवाय गरम पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो. त्यामुळं पोटासंबंधी किंवा पचनसंस्थेशी संबंधित काही समस्या असल्यास गरम पाण्याचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या