नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज सुटणं यासारखी समस्या असेल तर, तो ड्राय आय सिंड्रोम (dry eye syndrome - डोळे कोरडे पडणं) असू शकतो. आजकाल सतत लॅपटॉप आणि फोनसमोर राहिल्यामुळंही लोकांना हा त्रास होतो. सर्वसाधारणपणे ही समस्या मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये अधिक आहे. यासोबतच जर जीवनशैली योग्य नसेल आणि भरपूर धूळ असलेल्या परिसरात किंवा वाऱ्यानं माती उडणाऱ्या भागात राहिल्यास ड्राय आय सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. अशा काही गोष्टी आहेत ज्यांनी डोळ्यातील ओलावा टिकून राहतो. जाणून घेऊ सहजपणे डोळ्यांची काळजी कशी (Eye Care tips) घेता येईल.
भरपूर पाणी प्या
डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी आणि अश्रूग्रंथी योग्यरीत्या कार्यरत राहण्यासाठी शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात साधं पाणी पिणं चांगलं. शरीरात पाण्याची पातळी योग्य राहिल्यानं नैसर्गिक अश्रू आणि तेल योग्य प्रमाणात तयार होण्यास मदत होते. यासोबतच, कॉफी, अल्कोहोल आदींसारख्या शरीरातून पाणी बाहेर काढणाऱ्या पेयांचं सेवन मर्यादित प्रमाणातच करावं.
हे वाचा - चीनचा नवा कांगावा; म्हणे,अमेरिकेतील लॉबस्टर, सौदी अरेबियातील कोळंबी Coronaला कारणीभूत
पापण्यांची उघडझाप
सामान्यतः माणसाच्या पापण्यांची 1 मिनिटात किमान 15 ते 30 वेळा उघडझाप झाली पाहिजे. परंतु, हल्ली संगणक मॉनिटर, लॅपटॉप आणि मोबाईलवर काम केल्यामुळं लोकांच्या पापण्यांची नैसर्गिक उघडझाप कमी झालीय. याचा परिणाम डोळ्यांवरही होतो आणि डोळे कोरडे पडतात. यासाठी दर 20 मिनिटांनी 20 सेकंद डोळ्यांना विश्रांती द्या.
हे वाचा - फायर पाननंतर आता बाजारात आले फायर मोमोज! सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय VIDEO
वारंवार डोळे धुवा
मेकअप काढल्यानंतर आपले डोळे पाण्याने चांगले धुवा. बेबी शॅम्पू किंवा सौम्य साबण वापरणं चांगलं.
बाहेर जाताना चष्मा घाला
जर तुम्ही बाहेर गेलात तर धूळ आणि प्रदूषण टाळण्यासाठी सनग्लासेस लावा. तुम्ही ज्या काही सनग्लासेस वापरता त्या UB संरक्षित असाव्यात याची विशेष काळजी घ्या. असा चष्मा मॅक्युलर डिजनरेशनचा धोका देखील कमी करतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips